डॉ. प्रवीण बनकर
Livestock Farming : इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात, दक्षिणेकडील भागात संगम काव्याचा बहर होता, ज्यामध्ये शेकडोंच्या संख्येने गायी, म्हशी, मेंढ्या दान दिल्याचे दाखले आहेत. शिलालेखात देखील घोडे, हत्ती यांच्यासह बैलाची शिल्पे कोरल्याची दिसून येतात. त्याकाळी राजाची सांपत्तिक स्थिती राज्याच्या सीमा कुठपर्यंत पोहोचल्या आहेत, यासह राज्याच्या जवळ असलेले पशुधन यावरून ठरत असे.
विशिष्ट अशा गडद लाल (विटकरी) रंगाने आपले लक्ष चटकन वेधून घेणारी लाल कंधारी गाय ही देखील मराठवाड्याचीच. चौथ्या शतकात राजा सोमदेवराय याने आपल्या वडिलांच्या म्हणजे राजा कंधारी किंवा कान्हारी स्मृतीप्रित्यर्थ लाल रंगाच्या उमद्या जनावरांची निपज केली आहे. राजा कान्हारीचा अपभ्रंश लाल कंधारी असा झाला असावा.
लाकलबुंदा नावाने स्थानिक भागात परिचित असलेली कंधार या नांदेडमधील गावावरून लाल रंगाची असल्याने लाल कंधारी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख जात म्हणून ओळखली जाते. नांदेड सोबतच लातूर, हिंगोली, परभणी, बीड या भागातही लाल कंधारी आढळते.
स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद संस्थानात दूध व शेतीकामासाठी लाल कंधारीची पैदास करण्यात आली होती. आंध्रप्रदेशातील पारेखवाड, हनुमकुंड या भागात राजा सोमदेवराय याचा राज्यविस्तार असल्याने आजच्या आंध्र प्रदेशातील विविध भागात लाल कंधारी गोवंश हमखास दिसतो.
गोवंशाची वैशिष्टे
मध्यम आकार, रेखीव शरीर, लाल तांबडा रंग, भव्य फुगीर कपाळ, लोंबते कान, डोळ्यांभोवती चमकदार काजळी असते. हा चपळ गोवंश आहे. मध्यम आकाराची वक्राकार शिंगे, काळी खुरे, लहान कास. एका वेतामध्ये सरासरी ६०० किलोग्रॅम दूध मिळते. राज्य आणि देशपातळीवरील पशू प्रदर्शन आणि स्पर्धेत लाल कंधारीने गोवंशाने लौकिक मिळवून दिला आहे.
- डॉ प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९, (सहयोगी प्राध्यापक, स्ना.प.प.संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.