Desi Cow Agrowon
काळजी पशुधनाची

Desi Cow Conservation : व्यावसायिक देशी गोवंश जतन, संवर्धन गरजेचे

Indigenous Cattle Breed Maharashtra : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Team Agrowon

Akola News : शाश्‍वत शेतीसाठी दुग्ध व्यवसायाचा सक्षम आधार महत्त्वाचा असून, विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून देशी गोवंशाचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. विद्यापीठात ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिना’निमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

देशातील सर्वाधिक दुग्ध उत्पादनाची क्षमता असूनही, प्रतिजनावर उत्पादन कमी आहे, याकडे लक्ष वेधताना डॉ. गडाख यांनी शाश्‍वत दुग्ध व्यवसायासाठी काटेकोर नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. देशी गोवंश फक्त दूध देत नाही तर शेणखत, गोमूत्र आणि नवीन पिढी निर्माण करून संपूर्ण शेती साखळीला आधार देतो, असे त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. साधना घुगे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. देशी गायींच्या संख्येत वाढ, त्यांची उत्पादन व प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरे, स्पर्धा, प्रदर्शने यांचा उपयोग लोकचळवळ निर्माण करण्यासाठी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाचे विशेष प्रकल्प विभाग प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण यांनी विदर्भातील गौळाऊ, मराठवाड्यातील लाल कंधारी-देवणी, पश्चिम महाराष्ट्रातील खिल्लारी, कोकणातील डांगी, तसेच साहिवाल, गीर, थारपारकर आदी जातींचे संवर्धन, अभ्यास, प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.

वैरण पीक नर्सरी, मुरघास निर्मिती, गोबर गॅस, गांडूळ खत, दुग्ध पदार्थ निर्मिती आदी उपक्रमांचे प्रात्यक्षिकही विभागाच्या माध्यमातून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला डॉ. अरविंद सोनकांबळे, डॉ. ययाति तायडे, डॉ. शैलेश हरणे, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. निशांत शेंडे, डॉ. शशांक भराड, डॉ. अनिता चोरे, डॉ. जयंत देशमुख, डॉ. श्याम जाधव, विद्यापीठ नियंत्रक राजीव कटारे, आकाश दंदी यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

Raju Shetti: दुसऱ्यांदा मोजणीसाठी आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू

SCROLL FOR NEXT