Lumpy skin disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : शिराळा तालुक्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढला

Lumpy Skin Disease : शिराळा तालुक्यात दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. १ हजार २९१ जनावरांना लागण झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. १ हजार २९१ जनावरांना लागण झाली आहे. त्यापैकी ७३८ जनावरे बरी झाली आहेत. ४३७ जनावरांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत ११६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंता आहे. २५ हजार ९३४ जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यात गोवंशीय जनावरांची संख्या २६ हजार ४३२ इतकी आहे. तालुक्यात ९२ गावे असून, ५२ गावांत प्रादुर्भाव आढळून आला आहे.

तालुक्यात १३ लम्पीबाधित क्षेत्रे आहेत. पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम राबवली असून २५ हजार ९३४ जनावरांना लसीकरण केले आहे. तर उर्वरित ४९८ जनावरांचे लसीकरण अद्यापही झाले नसल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत बैल १४, गायी ५७, पाड्या २७, खोंड १८ असे एकूण ११६ जनावरे लम्पी रोगाने दगावली आहेत. तालुक्यात २० पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

एकूण गोवंशीय जनावरे २६४३२

तालुक्यातील बाधित क्षेत्र १३

लम्पीबाधित जनावरे १२९१

बरी झालेली जनावरे ७३८

उपचार सुरू असणारी जनावरे ४३७

मृत जनावरे ११६ (बैल १४, गायी ५७, पाड्या २७, खोंड १८)

शिराळा तालुक्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव असला, तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये. साथ आटोक्यात आहे. २० टक्के औषधोपचारांची गरज आहे. आवश्‍यकता भासल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
- डॉ. सतीश जाधव, पशुधन विकास अधिकारी, शिराळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT