Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : मुदखेड तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव

Lumpy Skin Latest Update : मुदखेड तालुक्यात लम्पी स्कीन आजाराने शिरकाव केला असून, एकाच गावातील दोन जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना घडल्याने शेतकऱ्यांनी मोठी धास्ती घेतली आहे.

Team Agrowon

Nanded News : मुदखेड तालुक्यात लम्पी स्कीन आजाराने शिरकाव केला असून, एकाच गावातील दोन जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना घडल्याने शेतकऱ्यांनी मोठी धास्ती घेतली आहे.

मुदखेड तालुक्यात आता जनावरांवर लम्पी आजाराने हल्ला चढवला असून, काही दिवसांपूर्वी मुगट येथील एका जनावराचा लम्पी आजाराने बळी घेतल्याच्या नंतर शेम्बोली, ता. मुदखेड येथील नागन नारायण सिंगेवाड, तसेच प्रभाकर देविदास कल्याणकर यांची दोन जनावरे लम्पी आजाराने दगावल्याची घटना मंगळवारी (ता. १९) घडली आहे. या घटनास्थळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. बंडेवार यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे.

पशुवैद्यकीय बारड, ता. मुदखेड दवाखान्यांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामुळे या आजारावर बहुतांश प्रमाणात नियंत्रण असले, तरी काही तुरळक जनावरांचे लसीकरण झाले नसल्याने काही प्रमाणात लम्पीची लक्षणे आढळून येत आहेत. लम्पी आजारात सुरुवातीस जनावरांना ताप येणे, अंगावर गाठी तयार होणे, चारा न खाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

या आजाराने आता दोन जनावरे दगावली असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच काळजीपोटी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पोळा सण साजरा करताना जनावरांना एकत्रित आणून गावात मिरवणूक काढण्यास पावबंद केला होता.

परंतु काही अति उत्साही शेतकरी, पुढारी व पोलिस विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत बैलांची प्रदक्षिणा, दस्त्या वाटप, बँड बाजा असे प्रकार घडल्याने लम्पी आजाराला खुले आमंत्रणच दिले गेले आहे.

जनावरांत लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. फैलाव रोखण्यासाठी गोठ्याची स्वच्छता, गेचुड व गोमाशी प्रतिबंधक उपाय करीत शेतकऱ्यांनी प्रत्येक जनावरे दूर बांधावीत.- एस.एस. बंडेवार, पशुवैद्यकीय अधिकारी, बारड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ

CCI Pending Dues: ‘सीसीआय’ची केंद्राकडे ८६ कोटींची थकबाकी

POCRA Scheme: ‘पोकरा’ योजनेसाठी समूह सहायकांची कामे करणार नाही

Cow Funding Crisis : राज्यमाता गाईंच्या परिपोषणाचा कोट्यवधींचा निधी थकित

SCROLL FOR NEXT