Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Nashik Lumpy Skin : नाशिक ‘लम्पी स्कीन’बाधित जिल्हा म्हणून घोषित

Lumpy Skin Disease : या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथीच्या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील या आजारासाठी बाधित क्षेत्र म्‍हणून घोषित करण्यात येत आहे.

या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथीच्या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (ता. २९) लम्पी स्कीन आजार प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांतील गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण, शीघ्र कृती दल स्थापन करून हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधित लसीकरणाचे नियोजनाबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

ज्याठिकाणी गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास त्याबाबत तत्काळ लगतच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयास संपर्क साधावा. गोठ्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे निर्जंतुक फवारणी करावी.

साथीच्या रोगामुळे मृत पावलेल्या जनावरांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही शर्मा यांनी दिल्या.

जनावरांची खरेदी-विक्री, बाजारास प्रतिबंध

बाधित क्षेत्रातील म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. आंतरराज्य, आंतर जिल्हा व जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय पशुधनाची सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस यंत्रणेचे साह्य घेण्यात यावे. तसेच परराज्यातून जे गोवर्गीय पशुधन आपल्या जिल्ह्यात येत असेल त्याच्या तपासणीसाठी आंतर राज्यमार्गावर तपासणी नाका सुरू करावा, असेही शर्मा या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT