Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : कात्रज दूध संघामार्फत लसीकरण सुरू

गेल्या महिन्यापासून लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यावर प्रभावी ठरणारे लसीकरण कात्रज दूध संघामार्फत सुरू करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या महिन्यापासून लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव वाढत असून, त्यावर प्रभावी ठरणारे लसीकरण कात्रज दूध संघामार्फत सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात संपूर्ण जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण होईल. याबाबत राज्य शासनदेखील आवश्यक त्या उपाययोजना राबवीत आहे.

त्या अधिक प्रभावीपणे राबवाव्यात तसेच सर्व जनावरांचे शासनामार्फत विमा उतरविला जावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात येईल, असे संघाच्या चेअरमन व सभेच्या अध्यक्षा केशर सदाशिव पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २०) झाली. त्या वेळी उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लम्पी स्कीन आजाराबाबत चिंता व्यक्त केली. या वेळी केशर पवार यांनी दूध संघ राबवीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. या वेळी त्यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उत्कृष्टपणे कामकाज करणाऱ्या १६ आदर्श दूध संस्थांची निवड करून त्यांना सन्मानचिन्ह व ११ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

दूध उत्पादक सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना चेअरमन व संचालक मंडळाने उत्तर दिल्यानंतर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेस आजी, माजी संचालक तसेच मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

संघाला २०२१-२२ या आर्थिक वर्षांत २ कोटी ४६ लाख निव्वळ नफा झाला आहे. दूध उत्पादकांनी २०२१-२२ मध्ये संघास पुरवठा केलेल्या दुधास प्रति लिटर १ रुपया दर फरक देण्याचे जाहीर करण्यात आले. मागील वर्षी दूधदर फरकापोटी रुपये ७.९० कोटी देण्यात आले होते. या वर्षी दूध दर फरकापोटी सुमारे ८.६३ कोटी देण्यात येणार आहेत. संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT