Livestock Census Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Census : सिंधुदुर्गातील १५६ गावांतील पशुगणनेचे काम पूर्ण

Animal Care : सिंधुदुर्गात २५ नोव्हेंबरपासून पशुगणनेचे काम सुरू झाले आहे. एकूण ८८७ महसूल गावे असून आतापर्यंत केवळ १५६ गावांमधील गणनेचे काम पूर्ण झाले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपासून पशुगणनेचे काम सुरू असून आतापर्यंत ८८७ पैकी १५६ गावांतील गणनेचे काम पूर्ण झाले असून, ५५२ गावांमध्ये पशुगणनेचे काम सुरू आहे. दरम्यान, अजूनही १७९ गावांमध्ये काम सुरू झालेले नाही.

सिंधुदुर्गात २५ नोव्हेंबरपासून पशुगणनेचे काम सुरू झाले आहे. एकूण ८८७ महसूल गावे असून आतापर्यंत केवळ १५६ गावांमधील गणनेचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय सद्यःस्थितीत ५५२ गावांमध्ये काम सुरू आहे.

मात्र अजूनही १७९ गावांमध्ये कामच सुरू झालेले नाही. साधारणपणे २८ फेब्रुवारीपर्यंत पशुगणनेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना शासनपातळीवरून देण्यात आलेल्या आहेत. पशुगणना करण्यासाठी ९२ प्रगणक,१८ पर्यवेक्षक, असे ११० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

पशुगणनेमध्ये गाय, म्हैस, डुक्कर, कोंबड्या, मेंढ्या, शेळ्या, भटके कुत्रे आदी प्रवर्गातील जनावरांची पशुगणना केली जात आहे. यापूर्वी केलेल्या पशुगणनेत सिंधुदुर्गात १ लाख ८८ हजार ९९ पशुधन होते. यामध्ये गायवर्ग १ लाख ५ हजार ५०८,म्हैस ५१ हजार १८०,मेंढ्या-१५,शेळ्या ३ हजार ३२,डुक्कर-१ हजार ३६४ या पशुधनांचा समावेश होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती पशुधन आहे याकरिता गणना सुरू आहे. या गणनेच्या आधारावर जिल्ह्याकरिता औषधोपचारासाठी निधी, लसचा पुरवठा होतो. याशिवाय वैद्यकीय दवाखाने, पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या होतात. त्यामुळे पशुपालकांनी पशुधनाची बिनचूक माहिती द्यावी.
- डॉ. आर. बी. दळवी, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Disease: झूनोसिस आजारांकडे नको दुर्लक्ष

Heavy Rainfall: राज्यात पावसाचा धुमाकूळ; मुंबई, ठाण्यासह अनेक शहरे, गावांमध्ये पूरस्थिती

Tractors Regulations: नव्या निर्णयांचा ट्रॅक्टरवर घाला

Heavy Rain Crop Loss : राज्यात १० लाख एकरवरील पीके पाण्याखाली; २ दिवसांत नुकसानीचे पंचनामे होणार: अर्थमंत्री अजित पवार

Forest Conservation: वन संवर्धनाचे गांभीर्य कधी?

SCROLL FOR NEXT