Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावामुळे जिल्‍ह्यातील पशुधनाचे बाजार बंद

काही दिवसांपूर्वी अकोले (जि. नगर) आणि पुणे जिल्ह्यातील कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथे लम्पी स्कीन (त्वचा) आजाराचा प्रादुर्भाव झालेले पशुधन आढळल्यानंतर आता याचा फैलाव जिल्ह्यातील वेल्हा वगळता सर्वच तालुक्यांत झाला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः काही दिवसांपूर्वी अकोले (जि. नगर) आणि पुणे जिल्ह्यातील कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथे लम्पी स्कीन (त्वचा) आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) झालेले पशुधन (Livestock) आढळल्यानंतर आता याचा फैलाव जिल्ह्यातील वेल्हा वगळता सर्वच तालुक्यांत झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील पशुधनाचे बाजार बंद (Livestock market Closed) करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, तातडीच्या उपाययोजनांसाठी लसीकरणाची (Lumpy Vaccination) मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली आहे.

जिल्‍ह्यामध्ये ७१ पशुधनांला लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून, ४ पशुधनांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. लम्पी स्कीनचा फैलाव संसर्गाने होत असल्याने बाधित पशुधन वेगळे करण्याच्या सूचना पशुपालकांना देण्यात आल्या आहेत. तर, जिल्ह्यातील लसीकरणासाठी तातडीने पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रसाद सिंह यांच्याकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लसींचा साठा देण्यात आला आहे. प्रादुर्भाव झालेल्या गावांमध्ये तातडीने शिबिरे घेण्याचे आदेश आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. तसेच, बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिघातील पशुधनांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

Soybean Farming: खेडच्या पूर्व भागामध्ये सोयाबीनला नवसंजीवनी

Kharif Season Crisis: पिके तहानली; उपसाबंदीने शेतकऱ्यांची कोंडी

Agriculture Department Staffing Plan: कृषी विभागाचा आकृतिबंध अखेर रद्द

Flower Farmers Struggle: फुलबाजारातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवा

SCROLL FOR NEXT