Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : पशुधनाचे बाजार गजबजू लागले

Animal Market : खानदेशात उन्हाळ हंगाम सुरू होताच पशुधनाचे बाजार गजबजल्याचे दिसत आहे. उमद्या बैलजोड्यांची खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी मध्य प्रदेशात जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उन्हाळ हंगाम सुरू होताच पशुधनाचे बाजार गजबजल्याचे दिसत आहे. उमद्या बैलजोड्यांची खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी मध्य प्रदेशात जात आहे. बैलजो़ड्यांचे दर तेथे वाढले आहेत.

बैलजोड्यांचे दर जनेवारीनंतर वाढण्यास सुरुवात होते. कारण पुढे खरिपासंबंधीच्या कामांसाठी अनेक शेतकरी नव्या बैलजोड्यांच्या शोधात असतात. अशातच खानदेशातील प्रसिद्ध बैलबाजार गजबजले आहेत.

काही शेतकरी बैलजोड्यांसाठी गावोगावी नातेवाईक, परिचितांकडे संपर्क साधून बैलजोड्यांसंबंधी विचारणा, चाचपणी करीत आहेत. तर काही शेतकरी थेट मध्य प्रदेशातील बडवानी, बऱ्हाणपूर, खरगोन येथील बाजारांमध्ये किंवा पाड्यांवर जाऊन बैलजोड्यांची खरेदी करीत आहेत.

खानदेशात बैलांसाठी जळगाव जिल्ह्यात वरखेडी (ता. पाचोरा), नेरी (ता. जामनेर), सावदा (ता. रावेर), चोपडा, वैजापूर (ता. चोपडा), धुळ्यातील साक्री हे बाजार प्रसिद्ध आहेत. तर शेळ्यांसाठी पारोळा, नेरी, साक्री, चोपडा, वैजापूर, फैजपूर, किनगाव येथील बाजार प्रसिद्ध आहेत. उमद्या बैलजोड्यांची शोधाशोध शेतकऱ्यांना करावी लागत आहे. अनेक शेतकरी आपल्या नातेवाइकांकडून बैलजोड्या खरेदी करून घेत आहेत. त्यात अधिकचे पैसे लागत आहेत.\

मध्य प्रदेशात सध्या एक लाख ते सव्वा लाख रुपयात बैलजोड्या मिळत आहेत. खरिपातील कामे गती घेत आहेत. भाडेतत्त्वावर बैलजोड्या देऊन अनेक शेतकरी वित्तीय स्रोत तयार करतात. एक हजार ते १२०० रुपये रोज, अशी मजुरी बैलजोडीकरवी मशागतीसंबंधी बैलजोडीमालकास मिळते. सध्या वरखेडी, चाळीसगाव, चोपडा, सावदा येथील बाजारात बैलजोड्या विक्रीतून मोठी उलाढाल होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Eknath Shinde Meets PM Modi: एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, PM मोदींची घेतली भेट, म्हणाले, 'महायुती'नं असा निर्णय घेतलाय...

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू

Cucumber Price: काकडीला उठाव; तसेच काय आहेत सोयाबीन, केळी, कोथिंबीर आणि बाजरीचे आजचे बाजारभाव

Crop Loan : पीककर्ज वसुली बंद होईना

Agrowon Podcast: कोथिंबीरचा भाव टिकून, सोयाबीनचा भाव दबावातच, केळीची आवक टिकून, बाजरी नरमली तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT