Devani Cow Agrowon
काळजी पशुधनाची

Indigenous Cow Breeding Center : अंबाजोगाईत ८१ एकरांवर लाल कंधारी, देवणी पैदास केंद्र

Rashtriya Gokul Mission 2023 : गेल्या काही वर्षांत पौष्टिक दूध असलेल्या गायी आणि शेतीच्या कामासाठी उपयुक्त बैलांची संख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय गोकूळ मिशनमधून हे केंद्र सुरू करण्यात येईल.

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai News : मराठवाड्यातील ‘लाल कंधारी’ आणि ‘देवणी’ या देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या भांडवली खर्चातून आणि राज्य सरकारच्या मनुष्यबळातून अंबाजोगाई (जि. बीड) येथे पशुपैदास केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

२०१३ ते २०१९ या काळात देवणी गोवंशाच्या संख्येत तीन लाख सात हजार ६०९ ने घट झाली आहे. गेल्या काही वर्षांत पौष्टिक दूध असलेल्या गायी आणि शेतीच्या कामासाठी उपयुक्त बैलांची संख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय गोकूळ मिशनमधून हे केंद्र सुरू करण्यात येईल.

राज्यात हे लाल कंधारी व देवणी या देशी गोवंश प्रामुख्याने मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत आहे. हे गोवंश देशी प्रकारातील आहेत.

या गायींचे दूध गोवंशीय पशुधनाच्या दूधापेक्षा जास्त पौष्टिक आहे. त्यास चांगली मागणी आहे. दरही जास्त मिळतो. बैलांचा उपयोग शेतीकामासाठी आहे. पशू प्रदर्शनात या पशुधनास नेहमीच राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत.

या प्रजाती नामशेष होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी केंद्राकडून राष्ट्रीय गोकूळ मिशन योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून पशुपैदास प्रक्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्रास सादर करण्यात आला आहे.

या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पशुपैदास प्रक्षेत्र उभारण्यासाठी भांडवली खर्च केंद्राकडून प्राप्त होईल. खेळत्या भांडवलाची तसेच मनुष्यबळाची उपलब्धता राज्य शासनाने करावयाची आहे. त्यानुसार साकूड, (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथे हे पशुपैदास प्रक्षेत्र कार्यान्वित करण्यात येईल. ८१ एकर जागेवर हे केंद्र उभारण्यात येईल.

‘देवणी’ची संख्येत ३ लाखांवर घट

२०१३ मध्ये केलेल्या गोवंशाच्या जातीनिहाय सर्वेक्षणानुसार लाल कंधारी गोवंशाची संख्या १ लाख २६ हजार ६०९, तर देवणी गोवंशाची संख्या ४ लाख ५६ हजार ७६८ इतकी होती. २०१९ च्या पशुगणनेत लाल कंधारी एक लाख २३ हजार ९४३, तर देवणी गोवंशीय पशुधनाची संख्या १ लाख ४९ हजार १५९ इतकी आहे. ही आकडेवारी विचारात घेता विशेषतः देवणी प्रजातीच्या संख्येत ३ लाख ७ हजार ६०९ घट झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT