Poultry Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Farming : शास्त्रीय कौशल्य मिळाल्यानंतरच व्यवसायामध्ये गुंतवणूक करा

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे नुकतेच अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसाय या विषयावर ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

टीम ॲग्रोवन

जालना: अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसायात (Poultry Farming) रोजगाराच्या (Employment) अनेक संधी आहेत. कोंबडी पालन व्यवसाय (Poultry Business) सुरू करताना कोंबडी पालनाच्या विविध बाजू समजून त्यामध्ये शास्त्रीय कौशल्य मिळाल्यानंतरच व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन महाराष्ट्र पशू मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. व्ही. धुमाळ यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे नुकतेच अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसाय या विषयावर ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. धुमाळ बोलत होते.जालना जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.

समारोप प्रसंगी जालना जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिगंबर कांबळे म्हणाले, ‘‘या व्यवसायामध्ये रोजगाराच्या अमाप संधी असून कोंबडीपालन व्यवसाय आज रोजी संशोधनाच्या रूपाने खूप अद्यावत झालेला आहे. या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून शेतकऱ्यांनी शेतीला या व्यवसायाची जोड द्यावी.’’

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी कृषी विज्ञान केंद्र आयोजित विविध प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱ्यांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन केले. या प्रशिक्षणात केव्हीकेचे पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ.एच. एम.आगे यांनी अर्धबंदिस्त कोंबडी पालन म्हणजे काय, कोंबडी पालन व्यवसायाची सद्यस्थिती, बाजारात असणाऱ्या अंड्यांना मागणी, मांसल कोंबड्यांची गरज व मादी कोंबड्यांची निर्मिती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT