Animal Feed Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed : पशुपक्षी खाद्याच्या बॅगवर होणार अन्नघटकांची नोंद

Department Of Animal Husbandry : पशुपक्षी खाद्याच्या बॅगवर त्यातील घटकांची माहिती नोंदविण्यात यावी, अशी पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी होती. त्याची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे निर्देश दिले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : पशुपक्षी खाद्याच्या बॅगवर त्यातील घटकांची माहिती नोंदविण्यात यावी, अशी पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी होती. त्याची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे निर्देश दिले.

त्यालाही कंपन्या जुमानत नसल्याने अखेरीस पशुसंवर्धन आयुक्‍तांनी स्वतंत्र आदेश काढत कंपन्यांना या बाबत दक्षता घेण्याची सूचना केली आहे. पशुसंवर्धन आयुक्‍तांचा हा आदेश कंपन्या किती गांभीर्याने घेतात हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे.

पशुपक्ष्यांच्या खाद्याची उत्पादक कंपन्यांकडून मनमानी दराने विक्री होते. कोणतेही कारण किंवा त्यातील घटकांच्या दरात वाढ झाली नसतानाही कंपन्या भाववाढ करतात. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्‍कुटपालन करणाऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो.

त्यामुळे कंपन्यांकडून पशुपक्षी खाद्य म्हणून दिल्या जाणाऱ्या बॅगवर त्यातील घटकांची माहिती नोंदविलेली असावी, अशी मागणी कुक्‍कुटपालकांची होती. राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पशुसंवर्धनमंत्री यांनी कंपन्यांना घटकांची नोंद बॅगवर करावी, असे निर्देश दिले.

३ नोव्हेंबर २०२३ रोजी या संदर्भातील आदेश देण्यात आले. मात्र त्यानंतर देखील अनेक कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा फेडरेशनकडून या बाबत नाराजी व्यक्‍त करीत या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास पशुसंवर्धन आयुक्‍तालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता.

या निवेदनाची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्‍तांनी शुक्रवारी (ता. ५) एका पत्राद्वारे राज्यातील सर्व प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्‍त, जिल्हा उपायुक्‍त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना सूचना दिली आहे. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पशुखाद्य कंपन्यांना या निर्णया बाबत माहिती द्यावी. त्यासोबतच अशा प्रकरणात काय कार्यवाही केली त्याचा अहवाल देण्याचे देखील सूचित्त करण्यात आले आहे.

या घटकांची मिळणार माहिती

अन्नघटकाचे प्रमाण (प्रोटीन, कार्बोहायड्रेड, फॅट, मॉइश्‍चर, कॅल्शिअम, फॉस्फरस, ॲश) बॅगवर नोंदविण्याची सूचना देण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ. हेमंत वसेकर यांनी या संदर्भातील सूचना वजा आदेश निर्गमित केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT