Cows and Buffaloes Agrowon
काळजी पशुधनाची

Breeds of Cows and Buffaloes : ओळख देशी गाई, म्हशींच्या जातींची...

Team Agrowon

डॉ. अमित क्षीरसागर, डॉ. चैत्राली आव्हाड, डॉ. प्रतीक जाधव

Identification of Indigenous Cow, Buffalo Breeds : मागील २० वर्षांत भारताने दुग्ध उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. त्यामुळे दुग्धोत्पादन हा पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो.

दुधाची दिवसेंदिवस वाढती गरज पाहता बहुतांश पशुपालक दुग्ध उत्पादनासाठी संकरित पशुधनाचे संगोपन करताना दिसतात. त्यामुळे बऱ्याच पशुधानाच्या देशी जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र भारतीय वंशावळीच्या गाई, म्हशींच्या दुधाची गुणवत्ता ही संकरित पशुधनाच्या तुलनेत अधिक चांगली आहे.

देशी पशुधनाच्या दुधासह अन्य उत्पादनांना देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशी गाईच्या दुधापासून तयार केलेल्या तुपाला बाजारात चांगले दर मिळतात. शिवाय शेण, गोमूत्राला देखील चांगली मागणी आहे.

याशिवाय देशी पशुधनाची रोग प्रतिकारकशक्ती ही संकरित पशुधनाच्या तुलनेत अधिक चांगली असल्याने त्यांच्यावर होणारा पशुवैद्यकीय खर्च देखील टाळणे शक्य होते. त्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी देशी पशुधनाच्या संगोपनावर भर देणे आवश्यक आहे.

भारतीय वंशांच्या प्रमुख दुधाळ गायी

गीर

गुजरात राज्यातील अमरेली, भावनगर, जुनागढ आणि राजकोट जिल्ह्यात.

वैशिष्ट्ये :

लांब कान.

मजबूत बांधा

लाल रंग.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी २० लिटरपर्यंत.

राठी (राठ)

राजस्थान राज्यातील बिकानेर, गंगानगर आणि जैसलमेर जिल्ह्यात.

वैशिष्ट्ये :

लांबसडक, संगोपनासाठी लागणारा खर्च तुलनेने कमी.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी १० लिटरपर्यंत.

साहिवाल

पंजाब राज्यातील फिरोझपुर, अमृतसर आणि राजस्थान राज्यातील गंगानगर जिल्ह्यात.

वैशिष्ट्ये :

टोकदार शिंगे

लाल रंग

दुधामध्ये फॅटचे प्रमाण उत्तम.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी १३ लिटरपर्यंत.

थारपारकर (पांढरी सिंधी, ग्रे सिंधी, धारी)

गुजरात राज्यातील कच्छ आणि राजस्थान राज्यातील बाडमेर, जैसलमेर, जोधपूर जिल्ह्यात.

वैशिष्ट्ये :

पांढरा आणि करडा रंग.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी ८ ते ९ लिटरपर्यंत.

गऊळाऊ/गवळाव

वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू, हेटीकुंडी व नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुका.

वैशिष्ट्ये :

पांढरा रंग.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी ३ लिटरपर्यंत.

कांकरेज (नागर, बनाई)

राजस्थान राज्यातील बाडमेर, जोधपूर आणि गुजरात राज्यातील मेहसाणा, खेडा, अहमदाबाद, बनासकांठा, साबरकांडा, कच्छ जिल्ह्यांत.

वैशिष्ट्ये :

गोलाकार शिंगे.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी ५ ते ६ लिटरपर्यंत.

म्हशींच्या प्रमुख जाती

पंढरपुरी

सांगली, सोलापूर आणि सातारा, कोल्हापूर जिल्हा.

वैशिष्ट्ये :

लांब व टोकदार शिंगे

काळा रंग

दुधामध्ये उत्तम फॅट.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी २० लिटरपर्यंत.

नागपुरी (बोरारी, गावराणी, वऱ्हाडी, गौळावी)

महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्हा.

वैशिष्ट्ये :

मध्यम बांधा

करडा रंग

टोकदार शिंगे.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी १० लिटरपर्यंत.

मुऱ्हा

हरियाना राज्यातील हिसार, रोहतक, गुडगाव, जिंद जिल्हा.

वैशिष्ट्ये :

अंगापिंडाने मजबूत.

वक्राकार शिंगे.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी २० लिटरपर्यंत.

मराठवाडी (एलीचपुरी आणि दुधणा थडी)

महाराष्ट्रातील जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात.

वैशिष्ट्ये :

मध्यम बांधा

सरळ शिंगे

रंगाला काळी.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी ७ लिटरपर्यंत.

जाफराबादी

गुजरात राज्यातील सौराष्ट्र, गीर जंगल, जाफराबाद जिल्हा.

वैशिष्ट्ये :

मजबूत बांधा

डोळ्यापासून शिंगे

दुधामध्ये फॅट उत्तम.

दूध उत्पादन : प्रतिदिन सरासरी १६ लिटरपर्यंत.

डॉ. अमित क्षीरसागर, ९४२२३४५६६

डॉ. प्रतीक जाधव, ८९९९६३९४१०

(लेखक पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT