Animal Management Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care In Summer : उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांची कशी घ्यावी काळजी?

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.

Team Agrowon

Animal Care : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.

त्यांच्यावरील उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वैरणीवर गुळपाणी (१ टक्के ) आणि मीठ (०.५ टक्के) यांचे स्वतंत्र द्रावण तयार करून शिंपडावे.

उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे, त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल.

जनावरे गोठ्याचे शेडचे छप्पर गवत, भाताचा पेंढा, किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून घ्यावे. त्यावर उन्हाच्यावेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी.

वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजविलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे. दर काही काळानंतर त्यावर हलके पाणी शिंपडावे.

जनावरांना सकाळी किंवा सायंकाळी चरावयास न्यावे. दुपारच्या वेळी जनावरांना चरावयाला नेणे टाळावे. शक्य तिथे सावलीत जनावरे बांधावीत.

कुक्कुटपालन

-कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत. त्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची मुबलक प्रमाणात द्यावे.

-खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस देण्यात यावे.

०उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर गवत, भाताचा पेंढा, किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून घ्यावे. त्यावर उन्हाच्यावेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी.

-वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजविलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT