Animal care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed Blocks : सकस आहार, अधिक दूध उत्पादनाकरिता संपूर्ण खाद्य ठोकळे कसे तयार करावेत ?

Animal Care : चाऱ्याचे खाद्य ठोकळे किंवा भेली तयार करुन जनावरांना टंचाई काळात सकस चारा उपलब्ध करुन देता येतो.

Team Agrowon

Animal Feed Management : आपल्याकडे जनावरांना चारा म्हणून अनेक पशुपालक उसाचे वाढे देतात. जनावरांना संतुलित आहार देत असताना सर्व खाद्य घटकांचे योग्य प्रमाण देणे महत्त्वाचे असते.

पशुपालक त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या चाऱ्यानूसार जनावरांच्या आहारात बदल करत असतात. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. तर उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते.

आहारात अतिरिक्त प्रमाणात हिरव्या चाऱ्याचा समावेश केल्यास, जनावरांना पोटफुगीसारखे आजार होतात तर, कोरडा चारा जास्त दिल्यामुळे जनावरांना उरमोडीसाखे आजार होतात.

चांगली वैरण ही उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली आहे, कारण दुभत्या जनावरांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी ६५ टक्के खर्च हा आहारावर होतो. हा खर्च कमी करण्यासाठी पुरेसा हिरवा आणि कोरडा चारा उपयोगी ठरतो.

वाढते शहरीकरण, कुरणांची घटती उत्पादकता, दर्जेदार चारा बियाण्यांची कमतरता, व्यावसायिक पीक लागवडीचे वाढते क्षेत्र तसेच एकाच प्रकारची पिके घेतल्यामुळे देशात चाऱ्याचे उत्पादन कमी होत आहे. चाराटंचाईमुळे चाऱ्याचे भाव वाढत आहेत.

त्यामुळे दुधउत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून चाऱ्याचे खाद्य ठोकळे किंवा भेली तयार करुन जनावरांना टंचाई काळात सकस चारा उपलब्ध करुन देता येतो.

या खाद्य ठोकळ्यामध्ये वाळलेला चारा, उसाची मळी, क्षारमिश्रण, भरडलेला मका किंवा ज्वारी आणि ढेप यांचा योग्य प्रमाणात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जनावरांना सकस चारा उपलब्ध होतो.

उसाच्या माळीचा वापर केला असल्यामुळे ज्याठिकाणी उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्याठिकाणच्या जनावरांसाठी अशा खाद्य ठोकळ्यांचा वापर केला जाऊ शकतो.  खाद्य ठोकळे तयार करताना आवश्यक घटक कोणते आहेत आणि त्याचे योग्य प्रमाण पुढीलप्रमाणे.

संपूर्ण खाद्य ठोकळे तयार करण्यासाठी आवश्यक घटक आणि त्याचे प्रमाण

वाळलेला चारा - ४६ टक्के 

उसाची मळी - ८ टक्के

क्षारमिश्रण - १ टक्का

भरडलेला मका किंवा ज्वारी - २३ टक्के

ढेप - २२ टक्के

------------

स्त्रोत - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT