Artificial Incimination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरातील कृत्रिम रेतनाची योग्य वेळ कशी ठरवावी?

जनावरातील यशस्वी गर्भधारणा कृत्रिम रेतनाच्या वेळेशी संबंधित असते. कृत्रिम रेतनाची वेळ पशुवंशनीहाय पशुआरोग्यनिहाय आणि प्रत्येक माजासाठी कमी अधिक अंतराने वेगवेगळी दिसून येते.

Team Agrowon

जनावरातील यशस्वी गर्भधारणा कृत्रिम रेतनाच्या (Artificial Incimination) वेळेशी संबंधित असते. कृत्रिम रेतनाची वेळ पशुवंशनीहाय पशुआरोग्यनिहाय आणि प्रत्येक माजासाठी कमी अधिक अंतराने वेगवेगळी दिसून येते. त्यामुळे कृत्रिम रेतन करताना योग्य वेळ कशी ठरवावी याविषयी माहिती असने अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनूसार कृत्रिम रेतन करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात. 

माजाचा कालावधी पशुपालकाने योग्य प्रकारे नोंद केलेला असल्यास रेतनाची योग्य वेळ ठरवणे सहज शक्य असते.


सर्वसाधारणपणे माजाच्या उतरत्या काळात तिसऱ्या टप्प्यात माज संपण्यापूर्वी सहा ते बारा तास अगोदर कृत्रिम रेतन करणे अपेक्षित असते. 

अचूक रेतनाच्या कार्यपद्धतीत स्त्रीबीज सुटण्याची वेळ आणि शुक्राणू उपलब्धतेची वेळ जुळून आल्यामुळे फलन होण्याचे प्रमाण वाढते. 

कृत्रिम रेतनाची वेळ शक्यतो तीव्र ऊन टाळून सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा असावी. 

माजाच्या कालावधीत फार लवकर अथवा फार उशिरा रेतन होणारी जनावरे गाभण राहत नाहीत. 

कृत्रिम रेतनाच्या तंत्रात माजाचा कालावधी कितीही कमी असला तरीही रेतनाची योग्य वेळ हाच भाग गर्भधारणेसाठी महत्त्वाचा असतो. 

कृत्रिम रेतनात अचूक वेळेबाबत ठेवल्या जाणाऱ्या नोंदी  माजाची योग्य वेळ ठरवण्यासाठी उपयोगी पडतात.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT