Nitrate poisoning in cattle Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Death : जनावरे गुदमरून का मृत्यु पावतात ?

जास्त नत्र असलेला चारा जनावरांनी खाल्ल्यानंतर त्यांना नायट्रेटची विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.

Roshani Gole

भारतात नत्रयुक्त खताची (Nitrogeneous fertilizer) निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे शेतीतही नत्रयुक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. आपल्याकडे शेतात खत द्यायचे म्हटल्यावर आपले शेतकरी शेतात युरिया वापरून मोकळे होतात.

युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे ४६ टक्के असते. पिकांच्या शाखीय वाढीसाठी नत्राची म्हणजे नायट्रोजनची आवश्यकता असते. नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास पिकांतील क्षारांचे प्रमाण देखील वाढते. हे क्षार जमिनीत झिरपून जमिनीतील पाणीसाठ्यात मिसळले जातात. हे पाणी सिंचनाच्या सुविधासाठी वापरल्याने पिकांमध्ये त्याची उपलब्धता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता असते.

जास्त नत्र असलेला चारा जनावरांनी खाल्ल्यानंतर त्यांना नायट्रेटची विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. हा नायट्रेट युक्त चारा पोटात गेल्यानंतर रक्तात मिसळेपर्यंत नायट्राईटमध्ये रुपांतरीत होत असतो. हे नायट्राईट रक्तातील हिमोग्लोबिन बरोबर संयोग पावते आणि मेट हिमोग्लोबिन तयार होते. असे झाल्याने रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते.

जितक्या जास्त प्रमाणात नायट्रेट युक्त चारा जनावरांच्या खाण्यात येतो. त्याच प्रमाणात शरीरात नायट्राईट तयार होत असते. असे झाल्याने शरीरातील विविध अवयवास ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो.

तीव्र विषबाधा झालेली असल्यास, जनावरे कोणतीही लक्षणे न दाखविता मृत्युमुखी पडतात. विषबाधेची तीव्रता मध्यम स्वरुपाची असल्यास, जनावरांना श्वसनास त्रास होतो. डोळ्यांच्या आतील त्वचा निळसर होते. रक्ताचा रंग गडद तपकिरी होतो. जनावरांचा तोल जाण्यास सुरुवात होते. त्यांना आकडी यायला लागते. शेवटी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने, जनावरांचा गुदमरून मृत्यु होतो. चाऱ्यातील नायट्राईटचे प्रमाण १.५ टक्क्यापेक्षा जास्त असल्यास जनावरांच्या आरोग्यास घातक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT