Lumpy Skin Disease  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून दिशा निर्देश जारी

Lumpy Skin Latest Update : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा, राज्य सीमेवरील तपासणी नाका येथून होणाऱ्या पशूंची वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nagpur News : जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहावा यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा, राज्य सीमेवरील तपासणी नाका येथून होणाऱ्या पशूंची वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे.

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाची माहिती, पशुपालक इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक राहील.

जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्या संबंधित लक्षणे दिसताच लगेच त्या जनावरांचे निरोगी जनावरांपासून विलगीकरण करणे आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून औषधोपचार करून घेणे या बाबी पशुपालक इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांना बंधनकारक राहणार आहे.

रोग प्रादुर्भावग्रस्त राज्य, जिल्ह्यामधून पशुधनाची ऑनलाइन पद्धतीने होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे. तसेच साथीच्या काळात बाधित राज्य, जिल्ह्यातील जनावरांचा जिल्ह्यात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.

गोठ्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड इत्यादींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करण्याचे ग्राम पंचायती, नगर पालिका, महानगरपालिका इत्यादींना निर्देशित केले आहे. जनावरांच्या वाहतुकीसंदर्भात, आंतरराज्यीय तपासणी नाके (केळवद व खुर्सापार, ता. सावनेर) येथून गोवंशीय जनावरांना नागपूर जिल्ह्यात प्रवेशाची पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT