काळजी पशुधनाची

शेळ्यांची कोणती जात पाळावी?

शेळीपालन व्यवसाय करताना, ठराविक उद्दिष्ट समोर असले पाहिजे. उद्दिष्ट असल्याने त्यानुसार व्यवस्थापन करणे सोयीचे जाते. त्यानुसार शेळीची आणि बोकडाची निवड करणे सोयीचे जाते.

Team Agrowon

शेळीपालन व्यवसायाकडे आजकाल सर्वाचा कल वाढलेला दिसून येतो. अगदी कमी खर्चात उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून हा व्यवसाय करता येतो. शेळीपालन (Goat Farming) व्यवसाय करताना, ठराविक उद्दिष्ट समोर असले पाहिजे. उद्दिष्ट असल्याने त्यानुसार व्यवस्थापन करणे सोयीचे जाते. त्यानुसार शेळीची आणि बोकडाची निवड करणे सोयीचे जाते.

आपल्याकडे शेळीपालन प्रामुख्याने मांस (mutton) उत्पादनासाठी केलं जाते. त्यासोबतच सध्या शेळीपालन दूध उत्पादनासाठीही (milk production) केले जाते. मांस किंवा दूध उत्पादनासाठी शेळीपालन करायचे असल्यास, त्यानुसार शेळ्यांच्या जातींची निवड करावी लागते.

मांस उत्पादनासाठी शेळीपालन करायचे झाल्यास, जास्तीत जास्त जुळे किंवा तिळे देणारी शेळी निवडावी. जन्मतः जास्त वजन देणारी करडे असावीत. दूध उत्पादनासाठी शेळीपालन करायचे असल्यास त्यानुसार शेळीची दुसरी जात निवडावी. शेळ्यांच्या कोणत्याही जातीची निवड करताना तेथील स्थानिक वातावरणाचा विचार करावा.

पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी (Osmanabadi) शेळी पाळली जाते. संगमनेरी शेळी (Sangamneri Goat) नगर, नाशिक आणि पुणे या पट्ट्यात दिसून येते. संगमनेरी शेळीचे संगोपन मांस उत्पादनाबरोबर दूध उत्पादनासाठी ही केले जाते. विदर्भातील अतिउष्ण वातावरणात टिकून राहून चांगली वजनवाढ देणारी शेळी, अशी ओळख आहे, बेरारी शेळीची (Berari). जास्त पावसाच्या प्रदेशात, जंगलांमध्ये चरून स्वतःचे पालन पोषण करणारी कोकण कन्याळ (konkan knyal) कोकणात आढळून येते.

शेळीपालनाचा व्यवसाय करताना तेथील स्थानिक प्रजातींचा विचार प्रामुख्याने करायला हवा. जगभरात शेळ्या-मेंढ्यांच्या अनेक जाती आढळून येतात. या जाती हजारो वर्षे त्याच वातावरणात राहिल्यानं, स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार झालेली दिसून येते.

महाराष्ट्रात वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. स्थानिक परिस्थितीनुसार शेळ्यांच्या जातीची निवड केल्यास चांगला फायदा दिसून येईल. शेळ्यांच्या खाद्याचा विचार केल्यास अत्यंत कमी खर्चात जास्त उत्पादन देऊ शकते. कारण मुळात शेळी हा जंगलांमध्ये चरून स्वतःचे पालनपोषण करणारा प्राणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT