Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : गोमाता दूध संस्थेमार्फत वडगावात मोफत लसीकरण

Mahesh Gaikwad

पुणे : जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने गवळी व सभासदांच्या पशुधनांचे मोफत ‘लम्पी स्कीन’ (Free Lumpy Skin Vaccination) या आजारांवरील लसीकरण (Animal Vaccination) करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक गडगे यांनी दिली.

याप्रसंगी सुरेश गडगे, राहुल खोकले, गणेश देवकर, विलास गाडगे, राजाराम भुजबळ, गोपाळ फुलसुंदर, रेश्मा चौगुले, सविता शिंदे, रामदास वाळंज, सचिव अभिषेक कोकाटे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. विजय देवकर यांच्या गोठ्यातील पशुधनास डॉ. सिद्धार्थ गाडगे, डॉ. हर्षल हाडवळे, डॉ. संजय घंगाळे यांनी लसीकरण केले. डॉ. महेश शेजाळ म्हणाले, की ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव म्हैस, गाय तसेच बैल या सर्व जनावरांना होते. विशेष करून याचा प्रादुर्भाव लहान वासरांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच, देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या विषाणू आजाराला अधिक बळी पडत आहेत.

पशुपालकांनी घाबरून न जाता लम्पी स्कीनसदृश लक्षणे आढळल्यास आपल्या गावात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

जनावरांच्या अंगावर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात, तसेच जनावरांचे दूध उत्पादन घटते. ताप येऊन डोळे व नाकातून चिकट स्राव येऊन त्यांची भूक मंदावते. ही लक्षणे लम्पी स्कीन आजाराची असून यासाठी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
डॉ. श्रीरंग बढे, पशुवैद्यकीय अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT