Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नांदेडला साडेचार हजार जनावरांना ‘लम्पी स्कीन’ची बाधा

नांदेड : जिल्ह्यातील २१६ गावातील साडेचार हजार गाय वर्ग पशुधनाला लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. तर या आजारामुळे २४२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील २१६ गावातील साडेचार हजार गाय वर्ग पशुधनाला लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Outbreak) प्रादुर्भाव झाला आहे. तर या आजारामुळे २४२ जनावरांचा मृत्यू (Animal Death) झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून (Department Of Animal Husbandry) उपाययोजना करूनही लम्पी स्कीनचा फैलाव सुरू असल्याने पशुपालकांना चिंता लागली आहे.

जिल्ह्यातील जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झाल्याने पशुपालक चिंतित आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून या आजाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू आहेत. परंतु लम्पीचा फैलाव सुरूच आहे.

गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकूण २१६ बाधित गावांत चार हजार ४३२ गाय वर्ग पशुधनाला लम्पीची प्रादुर्भाव झाला आहे.

आतापर्यंत या आजारामुळे २४२ पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. या आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या दोन हजार ८३८ आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन एक ३५८ आहे. सद्यःस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT