काळजी पशुधनाची

कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन

कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताना त्यांच्या खाद्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास रोगाला प्रतिबंध करणे सोयीस्कर जाते.

Team Agrowon

कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताना त्यांच्या खाद्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास रोगाला प्रतिबंध करणे सोयीस्कर जाते. कोंबड्यांना सुरुवातीचे काही दिवस भरडलेला मका खाण्यास द्यावा. त्यानंतर पुढील चार आठवडे त्यांना स्टार्टर खाद्य द्यावे. त्यापुढील चार आठवडे फिनिशर दिलं पाहिजे.

साधारणपणे कोंबडीचे एक पिल्लू आठ आठवड्याचे होईपर्यंत २.६ किलो खाद्याची गरज पडते. ब्रॉयलर (broiler) कोंबड्या या मांस उत्पादनासाठी पाळल्या जात असल्याने, जितकं जास्त वजन मिळेल, तितकं फायद्याचे ठरते.
पहिला पूर्ण आठवडा भरडलेला मका देत असताना, तिसऱ्या दिवसापासून स्टार्टर खाद्य देण्यास सुरुवात करावी. स्टार्टरचे (starter feed) प्रमाण प्रति पक्षी १० ग्रॅम याप्रमाणे द्यावे.

दुसऱ्या आठवड्यात खाद्याचे प्रमाण वाढवून २० ग्रॅम प्रति पक्षी या प्रमाणात द्यावे. तिसऱ्या आठवड्यात ३० ग्रॅम प्रति पक्षी असे द्यावे. चौथ्या आठवड्यापर्यंत ४० ग्रॅमपर्यंत मात्रा वाढवत न्यावी. पाचव्या आठवड्यापासून प्रति पक्षी ५० ग्रॅम फिनिशर खाद्य द्यावे. सहाव्या आठवड्यात फिनिशरचे (finisher) प्रमाण ६० ग्रॅमपर्यंत न्यावं. आठव्या आठवड्यात प्रति पक्षी ८० ग्रॅम फिनिशर खाद्य द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT