Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : शेतकऱ्यांची दौलत दीड महिन्यापासून बंद दाराआड

काळाच्या ओघात जनावरांची संख्या कमी होत आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी आपली दौलत टिकवून आहे. या दौलतीला लम्पी स्कीन आजाराचे ग्रहण लागले आहे.

टीम ॲग्रोवन

कऱ्हाड : जनावरांना शेतकऱ्यांची दौलत म्हणून ओळखले जाते. ज्यांच्याकडे जास्त जनावरे तो शेतकरी श्रीमंत समजला जातो. काळाच्या ओघात जनावरांची संख्या कमी होत आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी (Village Agriculture)आपली दौलत टिकवून आहे. या दौलतीला लम्पी स्कीन आजाराचे (Lumpy Skin Disease) ग्रहण लागले आहे.

परिणामी सरकारने जनावरांच्या बाजारावर बंदी घातली आहे. दीड महिन्यापासून शेतकऱ्यांची दौलत बंद दाराआड आहे. त्यामुळे बाजार समिती, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. लम्पी स्कीनमुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी ‘लम्पी स्कीन’ रोगाचा जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे.

त्या आजाराचा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात प्रादुर्भाव झाला. त्यानंतर प्रादुर्भाव वाढल्याने सातारा जिल्ह्यात तीन हजार ४४५ जनावरांना त्याचा प्रादुर्भाव झाला. त्यापैकी २२१ जनावरांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार पुढचे काही काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले.

खबरदारी म्हणून जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा-यात्रेतील बाजार व प्रदर्शनांवरही पुढील आदेश मिळेपर्यंत बंदी घातली आहे. सध्या जिल्ह्यातील जनावरांचे ९८.५० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाची तीव्रता कमी होत आहे. आता जनावरांचे बाजार सुरु करावे, अशी मागणी शेतकरी, व्यापाऱ्यांकडून होत आहे.

छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय

जनावरांना लागणारे सजावटीचे साहित्य विकणारे, दोऱ्यावाले, जनावरांना पत्र्या मारणारे, चहा, वडापाव, जेवण विक्रेते, वाहतुकीसाठीच्या वाहनांचे चालक यासह अन्य व्यावसायिकांचा उदरनिर्वाह जनावरांच्या बाजारावर अवलंबून असतो. मात्र जनावरांचे बाजार बंद असल्याने या व्यावसायिकांच्या पोटावरही पाय आला आहे. त्यांच्यावर आता मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जनावरांचे बाजार दीड महिन्यापासून बंद आहेत. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने बऱ्यापैकी जनावरांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे आजाराचा प्रादुर्भावही कमी होत आहे. प्रशासनाने आता अंदाज घेऊन जनावरांचे बाजार सुरु करावेत. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे हाल थांबतील.

- संजय शिंदे, शेतकरी, सातारा.

कऱ्हाड, जि. सातारा ः जनावरांचा बाजार बंद असल्याने जनावरांचे शेड मोकळे पडले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT