Sheep  Agrowon
काळजी पशुधनाची

Wool Processing : ढवळपुरीचे लोकर प्रक्रिया केंद्र हलविले करंदीला

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : करंदी (ता. पारनेर) येथे राज्यातील पहिले लोकर प्रक्रिया उद्योग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. चार दिवसांपूर्वी (ता. १६ फेब्रुवारी) त्याबाबतचा अध्यादेश निघाला, याअगोदर हे केंद्र सर्वाधिक मेंढपाळ असलेल्या ढवळपुरी परिसरात होणार होते. परंतु करंदी येथे हे केंद्र होणारा असल्याने या निर्णयाला तालुक्यातील मेंढपाळ, नागरिकांनी विरोध केला आहे.

मेंढपाळाची संख्या अधिक असलेल्या व पूर्वी जाहीर केलेल्या ढवळपुरी येथे होणारे हे केंद्र दुसरीकडे नेण्याचे कारण काय? असा प्रश्न मेंढपाळांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात गावकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात मेंढ्यांची संख्या ३० लाखांवर असून दरवर्षी अंदाजे ९ हजार ८०० टन लोकरीचे उत्पादन होते. तथापि, राज्यात खरखरीत लोकरीवर प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्यामुळे मेंढीपालन करणाऱ्या समुदायाला आर्थिक फायदा होऊ शकत नाही.

देशाच्या अवर्षणप्रवण, अर्ध अवर्षण प्रवण, डोंगराळ भागात जेथे पीक आणि दूध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. तसेच अत्यल्प भूधारणा, अत्यल्प भूधारक शेतकरी व भूमिहीन मजुरांना उपजीविका करण्यासाठी मेंढ्याची मोठी मदत होते. मेंढ्यांना लोकर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. लोकर हे नैसर्गिक फायबर आहे.

लोकरीत थर्मल रेग्युलेशन, फ्लेम रेझिटेन्स, ध्वनिशास्त्र असे त्यात वेगवेगळे गुणधर्म आहेत. अनेक कापडाच्या प्रक्रियेत लोकरीचा वापर केला जातो. राज्यात नगर जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे सुमारे ३ लाख इतक्या मेंढ्यांची संख्या आहे. त्यातील सर्वाधिक संख्या पारनेर तालुक्यात आहे.

ढवळपुरी येथे हा प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मेंढपाळांचे वास्तव्य ढवळपुरी, धोत्रे, ढोकी, पळशी, वनकुटे या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथेच होणे गरजेचे असल्याचे या भागातील लोकांचे मत आहे. प्रकल्प दुसरीकडे जाण्याला पालकमंत्री, खासदारांना जबाबदार धरले जात आहे. मेंढपाळाचे वास्तव्य असलेल्या भागापासून करंदी हे गाव २० किलोमीटर अंतरावर आहे.

ढवळपुरी व परिसरात मेंढपाळ समाज मोठ्या प्रमाणात आहे. ठिकाणी आताही लोकरीपासून जान व इतर उत्पादने तयार करण्याचे कारखाने छोट्या प्रमाणावर सुरू आहेत. हा प्रकल्प ढवळपुरीत सुरू झाला तर या लघुउद्योगांमध्ये भर पडण्यास मदत झाली असती. नियोजित सौरऊर्जा प्रकल्पासाठी शासनाची १५ एकर जागा ढवळपुरीत शिल्लक आहे. मात्र केवळ राजकारणासाठी हा प्रकल्प करंदी येथे हालविण्यात आला आहे.
- सुखदेव चितळकर, अध्यक्ष, दुर्गेश्वरी दुध संस्था, ढवळपुरी, ता. पारनेर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT