Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : वाढलेले खूर जनावरांसाठी घातक ; अशी घ्या काळजी

Animal Hoof Care : जनावरांच्या खुरांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. कारण या आजाराचा त्यांच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर होणारा परिणाम चटकन लक्षात येत नाहीत. खुरांची समस्या आपण पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी सक्षम खूर व्यवस्थापन प्रक्रिया राबवून या समस्येवर मात करता येते.

Team Agrowon

जनावरांच्या खुरांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. कारण या आजाराचा त्यांच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर होणारा परिणाम चटकन लक्षात येत नाहीत. खुरांची समस्या आपण पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी सक्षम खूर व्यवस्थापन प्रक्रिया राबवून या समस्येवर मात करता येते.

जनावरांच्या खुरांची वाढ होणं ही एक नैसर्गिक आणि सततची प्रक्रिया आहे. जी जनावरे सतत चालतात किवा श्रमाची कामं करतात त्या वेळी खुरांचे जमिनीशी घर्षण होऊन ती प्रमाणात वाढतात. पण योग्य काळजी न घेतल्यामुळे आणि अतिशय छोट्या बंदिस्त जागेत जनावरांना बांधून ठेवल्यामुळे खुरांची जास्त वाढ होते. याशिवाय वेळेवर खुरांची छाटणी न केल्यामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे खुरांची खूप जास्त प्रमाणात वाढ होते.

खुरांची जास्त वाढ झाल्यामुळे जनावरांना व्यवस्थित चालता येत नाही. जनावरांच आहार घेणं कमी होतं त्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता कमी होते. खुरांमध्ये जखमा झाल्यामुळे जनावरे लंगडतात. जखमेतून रोगजंतूचा शरीरात प्रसार होतो. याशिवाय मादी जनावरे माज दाखवत नाहीत तर नर जनावरे प्रजननात उदासीनता दाखवतात.

या समस्येवर उपचार करताना

जनावरांच्या वाढलेल्या खुरांची पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य प्रकारे आणि योग्य अंतरावर कापणी करावी.नाहीतर रक्तस्राव होऊन त्यात जखम होऊ शकते. जनावरांना एकच जागेवर जास्त काळ बांधू नये. शक्य असल्यास जनावरांना थोडा काळ चरण्यासाठी सोडाव जेणेकरून खुरांची झीज होऊन ती खूप जास्त वाढणार नाहीत.

कमी जागेत जास्त जनावरे ठेवू नयेत. गोठ्यातील पृष्ठभाग हा एकदम गुळगुळीत किवा मऊ नसावा. खुरांमध्ये जर जखमा झाल्या असतील तर त्या जखमा कोरड्या ठेवण्याचा प्रयत्न करावा.शेण, गोमूत्राचा जखमेशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करावा. जनावरांच्या खुराच्या नाजूक भागात काटा, खिळा, तार किंवा खडा रुतल्यास, लगेच खूर स्वच्‍छ करून काटा काढल्यास पुढे होणाऱ्या जखमेपासून जनावरांना वाचवता येते. अशा प्रकारे खुरांची काळजी घेतल्यास जनावरांतील खुरांचे आजार टाळता येतात.

माहिती आणि संशोधन- क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT