lumpy skin disease  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Compensation : पशुपालकांना ५७ लाख ७३ हजार रुपये भरपाई वाटप

लम्पी स्किनमुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक गायी साठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५ हजार रुपये, वासरासाठी १६ हजार रुपये अनुदान देण्यात येते.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारामुळे (Lumpy skin Disease) ३७५ जनावरे दगावली आहेत. त्यात गायी ४८, बैल १०० आणि वासरे २२७ आहेत.

मृत्यू झालेल्या ३३९ जनावरांच्या भरपाईपोटी (Lumpy Skin Compensation) पशुपालकांना ५७ लाख ७३ हजार रुपये अनुदान वाटप (Subsidy) करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

लम्पी स्किनमुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक गायी साठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५ हजार रुपये, वासरासाठी १६ हजार रुपये अनुदान देण्यात येते.

परभणी जिल्ह्यातील १४४ गावांत मंगळवार (ता. २१) अखेर लम्पी स्किन बाधित जनावरांची संख्या ४ हजार २३ होती. त्यात १ हजार ५६९ गायी आणि २ हजार ४५४ बैलवर्गीय जनावरांचा समावेश आहे. उपचारानंतर ३ हजार ४११ जनावरे बरी झाली आहेत.

परंतु ३७५ जनावरे दगावली आहेत. सध्या या आजाराच्या सक्रिय जनावरांची संख्या २३७ असून त्यापैकी ४७ जनावरे गंभीर आहेत. जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती.

त्यात १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय, १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय आणि ९८ हजार ४९५ म्हैस वर्गीय जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १४४ ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर त्रिजेतील गावांची संख्या ६२६ असून त्यापैकी २१७ गावात प्रादुर्भाव झाला.

जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार १५० गाय वर्गीय आणि १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय असे एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांच्या लसीकरणांसाठी २ लाख ९९ हजार ३०० लसी प्राप्त झाल्या होत्या. गोशाळांतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात गोवर्गात केलेले स्वच्छ लसीकरण २८ हजार ९ आहे. पर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ९१६ गायवर्गीय आणि १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय आणि ५ हजार ४६९ वासरे असे एकूण २ लाख ९७ हजार २५४ जनावरांचे (९९.१३ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. या आजाराची साथ नियंत्रणात आहे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

जिल्ह्यात ३७० पशुपालकांना अनुदान प्राप्त...

जिल्ह्यातील ३७० पशुपालकांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले ते समितीने मंजूर केले आहेत. त्यापैकी ३३९ पशुपालकांना ५७ लाख ७३ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले.

त्यात एकूण मृत गाईसाठी १२ लाख ९१ हजार रुपये, बैलांसाठी २१ लाख ९६ हजार रुपये, वासरांसाठी २२ लाख ८६ हजार रुपये भरपाई देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT