Bail Pola Agrowon
काळजी पशुधनाची

Bail Pola : रक्तदान करून अनोख्या पद्धतीने साजरा केला बैलपोळा

लम्पी स्कीन आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने बैलपोळ्याला बैलांना एकत्र आणण्यास, तसेच मिरवणूक काढण्यास बंदी आणली आहे.

टीम ॲग्रोवन

पारगाव, ता. आंबेगाव ः लम्पी स्कीन आजाराच्या (Lumpy Skin Disease) वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने बैलपोळ्याला (Bail Pola) बैलांना एकत्र आणण्यास, तसेच मिरवणूक काढण्यास बंदी (Ban On Bail Pola Celebration) आणली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील खडकवाडी येथे भैरवनाथ बैलगाडा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १२५ बाटल्या रक्त संकलित झाले.

स्कीन आजाराचे सावट बैलपोळा सणावर पसरले असून, जनावरांमध्ये त्याचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. भैरवनाथ बैलगाडा संघटना व पुणे ब्लड बँक यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला.

शनिवारी (ता. २४) दिवसभरात १२५ तरुणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक ब्लूटूथ हेडफोन, एक आवळ्याचे झाड व प्रमाणपत्र संघटनेतर्फे देण्यात आले. या वेळी प्रकाश कबाडी, माजी सरपंच अनिल डोके, उद्योजक गुलाब वाळुंज, वाळुंजनगरचे माजी सरपंच महेंद्र वाळुंज, संतोष रामभाऊ सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे, गोरक्ष पोखरकर, दिलीप डोके, दादाभाऊ वाळुंज उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT