Livestock Census Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Census : प्रगणकाला पशुधनाची योग्य माहिती देण्याचे आवाहन

Animal Care : बिनचूक पशुगणनेतून गावपातळीते राष्ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील धोरण ठरणार आहे.

Team Agrowon

Pune News : बिनचूक पशुगणनेतून गावपातळीते राष्ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील धोरण ठरणार आहे. हे धोरण पशुपालन आणि पशुपालकांच्या हिताचे असणार आहे. यामुळे पशुगणनेसाठी आलेल्या प्रगणकास पशुपालकांनी पशुधनाची बिनचूक माहिती द्यावी, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील भंडलकर यांनी केले.

जुन्नर तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने २१ वी पशुगणना करण्यात येत आहे. दर पाच वर्षांनी करण्यात येणारी पशुगणना या वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाइल अॅपच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. पशुगणनेला २५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून ती फेब्रुवारी २५ पर्यंत सुरू राहणार आहे.

तालुक्यात ३५ पशुवैद्यकीय दवाखाने असून त्याअंतर्गत ग्रामीण भागातील गावांसाठी २७, शहरी भागासाठी एक असे एकूण २८ प्रगणक व ६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात २२ नोव्हेंबर रोजी पशुगणनेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

२१ व्या पशुगणनेत पशुपालकाकडे असणाऱ्या पशूंचे वय, लिंग, जात, दुधाळ, भाकड तसेच शेती कामासाठीची संख्या यासह पशुधन पालकाचे आधार, मोबाइल, जमीन क्षेत्र आदी प्रमुख माहिती घेतली जाणार आहे. यामुळे पशुधनाची अचूक संख्या समजणार आहे. तसेच पशुधनाचे इअर टॅगिंग करण्यात येणार असल्याने शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना राबविण्यास मदत होणार आहे.

तालुक्यात २० व्या पशुगणनेतील आकडेवारी

गायी ः ८० हजार ३१७

म्हैस ः १६ हजार ४२८

शेळी ः ५८ हजार ३०६

मेंढ्या ः ३ हजार ५६०

वराह ः १५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT