Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे पशुसंवर्धन विभाग अलर्ट

Department Of Animal Husbandry : मागील वर्षी पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग यंदाही पुन्हा ‘अलर्ट’ मोडवर आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत ४० जनावरांमध्ये लम्पी स्कीनसदृश लक्षणे आढळून आली होती. ही बाब गांभीर्याने घेत पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना हाती घेतल्या. बाधित जनावरांवर उपचार केल्याने ३२ जनावरे बरी झाली. मात्र मालेगाव व सिन्नर तालुक्यात २ जनावरे दगावली. तर आणखी इतर ६ जनावरांवर उपचार सुरू आहेत.

अजूनही लम्पी स्कीन बाधित जनावरे आढळून येत असल्याने लसीकरणाचा वेग वाढविण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर आहे. मागील वर्षी पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग यंदाही पुन्हा ‘अलर्ट’ मोडवर आहे.

जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, चांदवड, सटाणा, सिन्नर व नांदगाव तालुक्यांत जनावरे बाधित झाली आहेत. तर आदिवासी पट्ट्यात इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत अद्याप आजाराचा शिरकाव नाही.

मागील वर्षीच्या तुलनेत परिस्थिती काहीशी बरी आहे. मात्र धोका अजूनही पूर्णपणे टाळलेला नाही. लम्पी स्कीनसदृश लक्षणे दिसून येत असल्याने पुन्हा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील वर्षी गायी व दुभत्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला होता.

त्यानुसार गोवर्गीय जनावरांमध्ये बैलांनाही वेळेत लसीकरण करण्यात आलेले होते. त्यानुसार बाधित जनावर आढळून आल्यास परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानुसार लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला. मात्र गायींना लसीकरण झाले, परंतु तेथे जन्माला आलेल्या वासरांना लसीकरण करण्यात आले नव्हते.

जिल्ह्यात पावणेनऊ लाख जनावरांना लस उपलब्ध

जिल्ह्यात ८ लाख ९५ लाख ५० इतके गोवर्गीय पशुधन आहे. त्यानुसार संपूर्ण पशुधनासाठी आता लसीकरण उपलब्ध झालेले आहे. जुलै महिन्यात ४ लाख ४७ हजार ३६८ हे पहिल्या टप्प्यात लसीकरण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ४ लाख ४७ हजार ५०० लसमत्रा उपलब्ध असून, लसीकरण केले जात आहे.

मालेगाव तालुक्यातील टाकळी व सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे बाधित क्षेत्र जाहीर केलेले आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास गावात बाधित क्षेत्र जाहीर करून तातडीने ५ किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात लसीकरण सुरू होते. सध्या निफाडमध्ये लक्षणे आढळून आल्याने नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. अंतिम निष्कर्ष प्राप्त नाही.
- डॉ. गिरीष पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT