Poultry Farming  Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Farming : पोल्ट्री शेडसह पक्ष्यांच्या नोंदणीला येणार गती

Animal Husbandry Department : राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक व त्यांच्याकडील पक्षी याविषयी एका क्‍लिकवर माहिती मिळावी, याकरिता जिल्हा पशुसंवर्धन आयुक्‍तांना आकडेवारी संकलनाचे निर्देश पशुसंवर्धन आयुक्‍तस्तरावरून देण्यात आले होते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक व त्यांच्याकडील पक्षी याविषयी एका क्‍लिकवर माहिती मिळावी, याकरिता जिल्हा पशुसंवर्धन आयुक्‍तांना आकडेवारी संकलनाचे निर्देश पशुसंवर्धन आयुक्‍तस्तरावरून देण्यात आले होते. मार्च २०२४ पर्यंतची मुदत त्याकरिता निश्‍चित केली होती. परंतु ही मुदत पाळण्यात न आल्याने आता या कामाला आता गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन विभागाकडे राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांची अधिकृत आकडेवारीच नाही. त्यामुळे कोंबड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उपाययोजनांबाबत सर्वंकष निर्णय घेता येत नाही. त्यामुळेच राज्यातील पोल्ट्री शेड तसेच त्यामधील पक्ष्यांची नोंद घ्यावी, असे निर्देश ८ जानेवारी २०२४ रोजी आयुक्‍तालयस्तरावरून देण्यात आले होते.

राज्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍तांमार्फत ही माहिती संकलित करण्याचे नियोजन होते. या मध्ये मांसल तसेच अंड्यावरील पक्षी अशा दोन्ही श्रेणींतील पक्ष्यांची नोंदणी होणार होती. परंतु अपेक्षित गतीने हे काम झाले नाही.

परिणामी राज्य शासनाकडे अद्यापही पोल्ट्री शेड व पक्ष्यांची नोंदणी होऊ शकलेली नाही. त्यामुळेच निश्‍चित आकडाही कळणे अवघड आहे. परिणामी, आता पुन्हा स्मरणपत्र पाठवीत या कामाला गती देण्याची सूचना आयुक्‍त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे.

‘प्रदूषण नियंत्रण’च्या नोंदणीला स्थगिती

पोल्ट्री शेडधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. असे प्रमाणपत्र असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांचीच नोंदणी केली जाणार होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना पोल्ट्री व्यवसायासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणीला स्थगिती दिली आहे. या निर्णयाच्या अधीन राहत पशुसंवर्धन विभागाकडे पोल्ट्री शेडची नोंदणी करावी, अशी स्पष्ट सूचनाही आयुक्‍तांनी पत्रातून दिली आहे.

पोल्ट्री योद्धा फेडरेशनने पशुसंवर्धन आयुक्‍तालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर पोल्ट्री शेडच्या नोंदणी संदर्भातील कामाला गती देण्याची सूचना केली आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांच्या इतरही मागण्यांबाबत विचार व्हावा.
- शरद गोडांबे, कार्याध्यक्ष (पश्‍चिम महाराष्ट्र), पोल्ट्री योद्धा फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT