Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : आळेफाटा येथे गाईंच्या बाजारात ५४ लाखांची उलाढाल

Livestock Market : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २१) झालेल्या गाईंच्या बाजारात २२० गाईंची विक्री झाली.

Team Agrowon

Pune News : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २१) झालेल्या गाईंच्या बाजारात २२० गाईंची विक्री झाली. यामुळे सुमारे ५४ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

बाजार समितीत भरत असलेला गाई बाजार हा पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा बाजार भरत असून, येथील बाजारात पुणे, नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, शिरूर, आंबेगाव, ठाणे तसेच इतर ठिकाणाहून संकरित दुधाळ जातीच्या गाया विक्रीसाठी येत असतात.

या आठवड्यात भरलेल्या बाजारात २५७ संकरित गाया विक्रीसाठी आल्या होत्या.यामध्ये अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे, संचालक नबाजी घाडगे, सचिव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख प्रशांत महाबरे यांनी दिली.

दरम्यान, पशुखाद्याचे बाजारभाव वाढतच चालले आहेत. याचा फटका दूध उत्पादकांना बसत आहे, अशी खंत ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे, रोहिदास निमसे, किरण कुऱ्हाडे, सुमीत वर्पे, दिलीप शरमाळे, याकूब सौदागर, चाँद शेख, उस्मान शेख, हबीब शेख, महंमद यासिर, नि.कुरेशी, अकबर शेख, नन्हुभाई शेख, जब्बार शेख, सय्या शेख, रूपेश कुऱ्हाडे, शानू बेपारी आदी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladaki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये जमा होणार का?

Nanded Assembly Constituency : नांदेडमध्ये तीन नवख्यांना मिळाली आमदारकीची संधी

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा

Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ; लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

Land Record Registration : गुंता इतर हक्क नोंदीचा

SCROLL FOR NEXT