Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : आळेफाटा येथील गाईंच्या बाजारात ४५ लाखांची उलाढाल

Cow Market : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील गाईंच्या बाजारात गुरुवारी (ता. १६) ४५ लाखांची उलाढाल झाली.

Team Agrowon

Pune News : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील गाईंच्या बाजारात गुरुवारी (ता. १६) ४५ लाखांची उलाढाल झाली. आळेफाटा येथील उपबाजारात दर गुरुवारी गाईंचा बाजार भरत असतो. त्यात पारनेर, अकोले, पुणे, नाशिक, संगमनेर, ठाणे, नगर, अकोले, राजगुरुनगर, तसेच इतर ठिकाणांहून संकरित दुधाळ जातीच्या गाया विक्री साठी येत असतात.

या आठवड्यात भरलेल्या बाजारात २५७ संकरित गाई विक्रीसाठी आल्या होत्या. यामध्ये गायींची विक्री होऊन १० हजारांपासून ८० हजार रुपयांपर्यंत विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक नबाजी गाडगे, सचिव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख प्रंशात महाबरे यांनी दिली.

दरम्यान, चालू वर्षी पाऊस अतिशय कमी झालेला असला, तरी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने व कालव्यांना वेळोवेळी पाणी येत असल्याने बहुतेक शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी चारा, पाणी उपलब्ध झाल्याने येथील गाई बाजारात या आठवड्यात दूध गवळी, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती.

दुधाचे बाजारभाव उतरले असल्याने गाईच्या किमती कमी झालेल्या आहेत, अशी माहिती रूपेश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, दिलीप सरमाळे, विजय थोरात, अमोल मोडवे, सिकंदर शेख, नन्नू शेख, रोहीदास निमसे, जब्बार शेख, जब्बार पठाण या व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT