Department Of Animal Husbandry  Agrowon
काळजी पशुधनाची

Department Of Animal Husbandry : नाशिक जिल्ह्यात १८ पशुधन पर्यवेक्षकांना पदोन्नती

Livestock Supervisor : पशुसंवर्धन विभागातील १८ पशुधन पर्यवेक्षकांना सहायक पशुधन विकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे.

Team Agrowon

Nashik News : पशुसंवर्धन विभागातील १८ पशुधन पर्यवेक्षकांना सहायक पशुधन विकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली.

जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन विभागाची अतिशय जलदगतीने पारदर्शक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. पशुसंवर्धन विभागातील १८ पशुधन पर्यवेक्षक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहायक पशुधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली.

त्यासोबत नवीन ठिकाणी बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले. यानिमित्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, शिला भारती, हेमंत मंडलिक, ज्ञानेश्‍वर पवार, अनिल गिते, अनिल दराडे, गौतम अग्निहोत्री यांचे पशुसंवर्धन संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.

या वेळी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भगवान पाटील, कार्याध्यक्ष डॉ. संतोष पजई, सरचिटणीस डॉ. सुभाष वाघमोडे, कोशाध्यक्ष डॉ. विनायक भंडारे, डॉ. रवींद्र चांदोरे, जिल्हा परिषद महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, सरचिटणीस विक्रम पिंगळे उपस्थित होते.

...यांना मिळाली पदोन्नती

महादू गावित (कासारी, ता. नांदगाव), संजय कहांडळ (मुखेड, ता. निफाड), ज्योती पाटील (ओढा, ता. नाशिक), सुनील संत (गिरणारे, ता. नाशिक), राजेश जावरे (निमोण, ता. चांदवड), प्रल्हाद गावित (पाटणे, ता. मालेगाव), अरुण भिवसन (सावळाखडी, ता. मालेगाव), गणेश भोये (पं.स. देवळा), विष्णू गंभिरे (पाटोदा, ता. येवला), भगवान भुसारे (बाणगाव, ता. नांदगाव), हरिश रोकडे (जळगाव नेऊर, ता.येवला), शेखर येवलेकर (दापूर, ता. सिन्नर), सौरभ विभूते (करंजवन, ता.दिंडोरी), सचिन घोरपडे (अंदरसूल, ता. येवला), निवृत्ती आहेर (काजीसांगवी, ता. चांदवड), जगन्नाथ राठोड (अस्वली, ता. इगतपुरी), राजेंद्र केदार (उगाव, ता. निफाड), प्रवीण पानसरे (आशेवाडी ता. दिंडोरी).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT