Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नांदेडमध्ये १५५ जनावरांना बाधा

नांदेड जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’बाधित पशुधनाची संख्या १५५ झाली आहे. तर नऊ जनावरांचा यात मृत्यू झाला आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : नांदेड जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ बाधित (Lumpy Skin Disease)पशुधनाची (Livestock) संख्या १५५ झाली आहे. तर नऊ जनावरांचा यात मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर (Lumpy Vaccination)अधिक भर दिला आहे.

मंगळवारी (ता. २७) जिल्हाभर लसीकरणावर भर देऊन १३ हजार २९० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात दोन लाख ४९ हजार १४३ पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.लम्पी स्कीन हा आजार गोठ्यातील अस्वच्छता,

पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर कीटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील ४२ गावे ‘लम्पी’बाधित आहेत.

या ४२ गावात एकूण १९ हजार ९५७ एवढी जनावरांची संख्या आहे. यातील १५५ बाधित जनावरांना वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिघातील गावांची संख्या २७० आहे. एकूण गावे ३१२ झाली आहेत.

या बाधित ४२ गावांच्या पाच किलोमीटर परिघातील ३१२ गावांतील ८७ हजार ९८० जनावरांची संख्या आहे. उपलब्ध लस मात्रा तीन लाख ७८ हजार असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT