Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नागपूर जिल्ह्यात ‘लम्पी’बाधित जनावरांची संख्या आता १३८

Lumpy Skin Vaccination : ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढता असून, गेल्या दोन दिवसांत सुरुवातीला असलेल्या ६७ बाधित जनावरांची संख्या बुधवारी (ता. ९) वाढत १३८ वर पोहोचल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली.

Team Agrowon

Nagpur News : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढता असून, गेल्या दोन दिवसांत सुरुवातीला असलेल्या ६७ बाधित जनावरांची संख्या बुधवारी (ता. ९) वाढत १३८ वर पोहोचल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली.

सावनेर तालुक्‍यात बाधित जनावरांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता लक्षात घेता खबरदारीच्या उपायांतर्गत यापूर्वीच लसीकरणावर भर देण्यात आला होता.

त्यानुसार १ लाख ९६ हजार गायवर्गीय जनावरांचे लसीकरण आजवर झाले असून नव्याने दोन लाख लस मात्र जिल्ह्याला उपलब्ध झाल्या आहेत.

‘‘नवीन जन्माला येणाऱ्या वासरांची प्रतिकारशक्‍ती कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

बाधित जनावरांची संख्या वाढती असली तरी पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्याअंतर्गत उपचार होत असल्याने सध्या जिल्ह्यात एकही दगावल्याची केस नोंदविण्यात आली नाही,’’ असे नागपूरचे सहायक आयुक्‍त (पशुसंवर्धन) युवराज केने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT