Soil Health Agrowon
ॲग्रो गाईड

Soil Health : जमिन क्षारपड का होते?

विविध कारणांमुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांच व पाण्याच प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन सुपीक जमिनी क्षारपड व पाणथळ होऊन नापीक होत आहेत.

Team Agrowon

विविध कारणांमुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांच व पाण्याच प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन सुपीक जमिनी (Fertile Soil) क्षारपड व पाणथळ होऊन नापीक होत आहेत.

क्षारामुळे नदीकाठच्या आणि कालवा सिंचन क्षेत्रातील जमिनीच्या भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मावर परिणाम होतो.

क्षारपड जमिनीमुळे सिंचन क्षेत्रातील विहिरी व कूपनलिकेतील पाणीसुद्धा क्षारयुक्त होत. माती परीक्षण करून क्षारपड (Saline Soil) जमिनीच वर्गीकरण करता येत.

क्षारपड जमिनीमध्ये क्षारयुक्त, क्षारयुक्त - चोपण आणि चोपण जमीन असे तीन प्रकार आहेत. या प्रकारानुसार जमिनीची सुधारणा करण अवलंबून असत, अन्यथा जमिनी जास्त क्षारपड होत जातात.

त्यासाठी अशा विविध क्षारपड जमिनींचे प्रकार, कारण, गुणधर्म आणि सुधारणा समजून घेऊनच एकात्मिक पद्धतीन जमिन सुधारणेवर भर द्यावा लागतो. जमिनी क्षारपड होण्याची कारण काय आहेत याविषय़ी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

उष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस कमी असल्यामुळ जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही.

सिंचन क्षेत्रात भारी चिकण मातीच्या अतिखोल काळ्या, निचरा कमी असलेल्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यामुळे.

नैसर्गिक ओढे, नाले बुजवून जमिनींची ठेवण सखल भागात केल्याने भूमिगत नैसर्गिक निचरा कमी होतो. त्यामुळ क्षार जमिनीतच साठतात.

कालवा सिंचन क्षेत्रात कालव्याच्या बाजून कॉंक्रिट मुलामा न केल्यान पाण्याच्या पाझरामुळे आजूबाजूच्या जमिनी पाणथळ होऊन क्षार व चोपणयुक्त बनतात.

जास्त पाणी लागणारे उसासारखे पीक वारंवार घेतल्यान व पिकांची फेरपालट न केल्यामुळेही जमिनी क्षारपड होतात.

राज्यातील जमिनी अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनल्या आहेत. त्यामध्ये अल्कधर्मीय खनिजांचे प्रमाण जास्त आहे. खनिजांच्या विघटनानंतर मुक्त क्षार जमिनीत साठतात. सिंचनास क्षारयुक्त पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळेही जमिनीतील क्षारांच प्रमाण वाढत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT