Onion Disease Agrowon
ॲग्रो गाईड

Onion Diseases : ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर कोणता रोग येतो?

बऱ्याच ठिकाणी कांदा पीक वेगवेगळ्या अवस्थेत आहे.सतत बदलत असलेले हवामान आणि धुक्यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय.

Team Agrowon

राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी पाऊसही झालाय.पावसाला पोषक हवामान व ढगाळ हवामानामुळे (Cloudy Weather) किमान तापमानात वाढ होत थंडीही गायब झालीय.त्यामुळे पहाटेच्या वेळी धुक्याच प्रमाण वाढलय.

बऱ्याच ठिकाणी कांदा पीक (Onion Crop) वेगवेगळ्या अवस्थेत आहे.सतत बदलत असलेले हवामान आणि धुक्यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय.  

कांद्यावरील रोग (Onion Diseases) आणि किडीची लक्षणं आणि त्यांच नियंत्रण कस करायच? याविषयी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील पीक शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी दिलेली माहिती पाहुया.

कांदा पिकावरिल करपा रोगाचे जांभळा, काळा आणि तपकिरी असे तीन प्रकार आहेत.जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानावर सुरवातीला लांबट पांढुरके चट्टे पडतात.

चट्ट्यांच्या मधला भाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. असे अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात. ढगाळ वातावरणात या रोगाची तीव्रता वाढते.   

काळा करपा रोगामध्ये सुरुवातीला पानाची बाह्य बाजू व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात.

त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढून पाने वाळतात. कांद्यांची वाढ होत नाही. रोपांची पाने काळी पडून वाळतात. 

तपकिरी करपा रोगामध्ये पिवळसर,तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.

फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होऊन, वाकून मोडून पडतात.

करपा रोगाच नियंत्रण करण्यासाठी

मॅन्कोझेब ०.३ टक्के ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ०.१ टक्के १ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल ०.१ टक्के

किंवा हेक्झाकोनॅझोल १ मिली किंवा मेटीराम ५५ टक्के प्रती लिटर पाण्यात मिसळून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. 

दोन ते तीन वर्षांनी पिकांची फेरपालट करावी.

क्लोरोथेरोनॉल ०.२५ टक्के २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. 

फवारणीची सुरुवात कांदे लावल्यानंतर ४० ते ५० दिवसांनी करावी. 

रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. वाफ्यामध्ये पाणी साचू देऊ नये. 

बी पेरण्यापूर्वी बियाण्यास ५० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात वीस मिनिटांसाठी बुडवून ठेवाव. म्हणजे हा रोग काही प्रमाणात आटोक्यात आणता येतो. 

एका शिवारात सर्व शेतकऱ्यांनी फवारणी एका ठराविक काळात केली तर रोगाच नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकत. 

पुनर्लागवड करताना रोपे कार्बेन्डाझिम ०.१ टक्के एक ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात दहा ते पंधरा मिनिट बुडवून घ्यावीत व नंतर लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT