Wheat Irrigation Management 
ॲग्रो गाईड

Wheat Irrigation Management : या अवस्थेत गहू पिकाला पाणी देणे गरजेचे

ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

Team Agrowon

ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये, पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी म्हणजेच मुकुट वाढ अवस्थेत ओलीताच्या वेळी युरीया खत प्रती ५० किलो प्रति हेक्टर द्यावे. 

गहू पिकाला पुढील महत्वाच्या अवस्थांमध्ये ओलीत करावे  

मुकुट मूळ फुटवे अवस्था - लागवडीनंतर १८ ते २० दिवस 

मशागतीची अवस्था - ३० ते ३५ दिवस  

फुलोरा अवस्था - ६५ ते ७०  दिवस 

दाणे भरण्याची अवस्था - ८० ते ८५ दिवस 

दाणे परीपक्वता अवस्था - ९५ ते १०० 

ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते तीन पाणी देणे शक्य असल्यास ते पुढील प्रमाणे दयावे.    

एकच ओलीत उपलब्ध असल्यास ४० ते ४२ दिवसांनी तर दोन ओलीत उपलब्ध असल्यास १८ ते २० व ६० ते ६५ व्या दिवशी पाणी द्यावे. 

चांगल्या उत्पादनासाठी तीन ओलीत उपलब्ध असल्यास १८ ते २०, ४० ते ४२ व ६० ते ६५ व्या दिवशी पाणी द्यावे. 

बागायती गव्हाची उशिरा पेरणी

उशिरा पेरणीसाठी बागायती गव्हाची पीडीकेव्ही सरदार, एकेएडब्ल्यू ४२१०-६, एकेएडब्ल्यू ४६२७, एकेएडब्ल्यू १०१७ (पूर्णा) एकेडब्ल्यू-३८१, एचआय ९७७ या शिफारस केलेल्या वाणाची निवड करुन १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत पेरणी आटोपावी. पेरणी अगोदर पीएसबी अधिक अझॅटोबॅक्टर प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि व्हियाव्हॅक्स (७५ टक्के डब्ल्यू पी) प्रति २.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे सह बीजप्रक्रिया करावी. रासायनिक खते ४० : ४० : ४० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टर पेरणी सोबत व ४० किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर १८ ते २० दिवसांनी पहिल्या ओलितासोबत द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

Yellow Mosaic Disease: शेंगा अवस्थेतील सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव

Maharashtra Drought : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी पूर्ण; अहवाल शासनाला सादर होणार

SCROLL FOR NEXT