Crop Nutrient Management Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Management : चांगल्या उत्पादनासाठी विविध पिकात कोणते बदल कराल?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विविध पिकासाठी कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.

Team Agrowon

मराठवाड्यात २९ सप्टेंबर पर्यंत सरासरी एवढा तर ३० ते ६ ऑक्टोबर दरम्यान सरासरी एवढा पाऊस राहण्याची शक्यता आहे. बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विविध पिकासाठी पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे. 

- संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी व फळगळ होऊ नये म्हणून 00:५२:३४ १५०० ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड १ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

- डाळिंब बागेत रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण (०.५ % ) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (५० % डब्ल्यूपी) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड (५३.०८ %) २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर ०.३ ते ०.५ मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. डाळिंब बागेत फळवाढीसाठी ००:५२:३४ १५०० ग्रॅम व जिब्रेलिक ॲसिड १ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मिरची, वांगी व भेंडी पिकात रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन (५ %) + फेनप्रोपाथ्रीन (१५ %) १० मीली किंवा डायमेथोएट (३० %) १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी.

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी ६५ ते ७० दिवसांनी तर नंतरच्या कापण्या ४० ते ४५ दिवसानी (७ ते ८ कापण्या) कराव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा कडका राहणार: राज्यातील बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमानात घट

Karanja Assembly Constituency : कारंजा मतदार संघाला ४६ वर्षानंतर मिळाल्या पहिल्या महिला आमदार

Jayakwadi Dam : जायकवाडीतून मिळणार रब्बीसाठी तीन आणि उन्हाळी पिकांसाठी चार अवर्तन

Agriculture Irrigation : सिंचनासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण

Rabi Season 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी

SCROLL FOR NEXT