Green Manuering Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Green Manuering Crop : हिरवळीचे खते गाडताना काय काळजी घ्यावी?

हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करून ऑगस्टमध्ये गाडणी करावी.

Team Agrowon

Green Manuering : शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढवलेली पिकांना हिरवळीची खते (Green Manuering Crop) असे म्हणतात.

ही पिके फुलोरा अवस्थेत आल्यानंतर शेतात पलटी नांगराच्या अथवा साध्या नांगराच्या साह्याने जमिनीत गाडली जातात. त्यातून सेंद्रिय पदार्थ आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता मुख्य पिकांना होऊ शकते. पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरावे.

तयार झालेले पीक लुसलुशीत असताना अथवा फुलोरा अवस्थेत असताना जमिनीत गाडले जाते. ही हिरवळीची खते गाडताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेच आहे.

हिरवळीचे खते जमिनीत कधी गाडावीत?

नुकतेच फुलोऱ्यात आलेले हिरवळीचे पीक जमिनीलगत कापावे. हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आलेले असावे. सामान्यतः ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलोऱ्यावर येतात.

बाहेरून हिरवळीच्या पिकांची पाने आणून ते नांगरट किंवा चिखलणीपूर्वी टाकून गाडावीत. या वेळी ट्रायकोडर्माचा उपयोग केल्यास खताची प्रत वाढवता येते.

हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी किंवा मैद फिरवावा. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे झाकले व दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरू होते.

हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करून ऑगस्टमध्ये गाडणी करावी.

पीक गाडण्याच्या वेळी पाऊस पडला नसेल, किंवा जमिनीलगत ओलावा कमी असल्यास पाणी द्यावे. कुजण्याची प्रक्रिया जलद होते.

शेतात उपलब्ध काडी-कचरा व गवत ह्यांचे ढीग शेतात जागोजागी करून कुजू द्यावेत. योग्यवेळी जमिनीत गाडावेत. कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी खड्डयात गवत व काडी-कचरा कुजवता येईल.

कपाशीच्या रांगामध्ये तृणधान्य, शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन कापणीनंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे.

हिरवळीच्या खते गाडताना या चुका टाळा

जिरायती शेतीत कमी पावसामुळे हिरवळीचे खत व्यवस्थित कुजत नाहीत. परिणामी, मुख्य पिकाच्या उगवणीवर व वाढीवर परिणाम होऊ शकतो.

हिरवळीचे पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणे आवश्‍यक आहे. उशीर झाल्यास पिकातील कर्ब:नत्र गुणोत्तर वाढते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढते, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते.

नुसतेच हिरवळीचे पीक घेतल्यास पिकाचा एक हंगाम वाया जाऊ शकतो. शक्यतो हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे.

कमी पावसाच्या भागात हिरवळीची पिके घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो.

हिरवळीच्या पिकांच्या सतत लागवडीमुळे पिकावर रोग, किडी व सूत्र कृमींची वाढ होऊ शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT