Watermelon
Watermelon Agrowon
ॲग्रो गाईड

विविधरंगी कलिंगड, खरबूज थेट विक्रीतून नफा वाढवण्याचे कसब

sandeep navale

बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रल्हाद वरे यांनी आतून व बाहेरून विविध रंगी व आकर्षक अशा कलिंगड व खरबुजांची शेती (Watermelon and melon farming) यशस्वी केली आहे. व्यपाऱ्यांना कमी दरांत माल विकण्यापेक्षा स्टॉल उभारून ग्राहकांत आपल्या मालाची लोकप्रियता मिळवून थेट विक्रीतून दरवर्षी चांगला नफा कमावण्याचे कसब वरे यांनी विकसित केले आहे.

मळद (ता. बारामती जि. पुणे) व पवारवाडी (ता. फलटण जि. सातारा) येथे प्रल्हाद वरे यांच्या एकत्रित कुटुंबाची ३४ शेती आहे. थोरले बंधु रामदास, बाळासाहेब, प्रल्हाद, हनुमंत अशा चार भावांचे व एकूण २७ सदस्यांचे त्यांचे कुटुंब आहे. पूर्वी ऊस (Sugarcane) हे त्यांचे मुख्य पीक होते. तेही पाटपाण्यावर. कालांतराने १९९७ पासून प्रल्हाद बारामती येथील कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आले.
त्या माध्यमातून राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन चर्चा करणे, शिवारफेरीत सामील होणे, तज्ज्ञांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे आदी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे
आपण कुठे चुकतोय ते समजू लागले. पारंपरिक शेतीला (Farming) छेद देऊन आधुनिक व सुधारित पद्धतीने शेती होऊ लागली. भाजीपाला, फळभाज्या, फळपिके, तेलबिया, चारापिके (Vegetables, fruits, vegetables, oilseeds, fodder crops) अशी विविधता ते घेऊ लागले.

कलिंगड, खरबुजाची शेती (Kalingad, melon farming)

प्रल्हाद यांनी अनेक वर्षांपासून कलिंगड, खरबुजाच्या शेतीत सातत्य ठेवले आहे. काळानुसार
व्यवस्थापन व तंत्रज्ञानात त्यांनी बदल केले. दरवर्षी ते उन्हाळ्यात (Summer) सुमारे साडेपाच एकरांपैकी साडेतीन एकरांत कलिंगड व उर्वरित क्षेत्रात खरबुजाची लागवड करतात. सेंद्रिय व रासायनिक अशा एकात्मिक शेती पध्दतीचा (रेसिड्यू फ्री) वापर ते करतात. यात शेणखत, कोंबडी खत, गांडूळ खत, व्हर्मिवॉश, नाडेफ खत, निबोंळी पेंड, ट्रायकोडर्मा, 9Chicken manure, earthworm manure, vermiwash, Nadef manure, neem powder,) भूसुधारक स्लरी, वेस्ट डी कंपोझर, दशपर्णी अर्क, जैविक कीटकनाशके उदा. बिव्हेरिया बॅसियाना आदी निविष्ठांचा योग्य प्रकारे वापर करतात. ठिबक संच, मल्चिंग पेपर, प्रोटेक्शन नेट, माती व पाणी परीक्षण यांची जोड असतेच. मल्चिंग पेपरमुळे मजुरी खर्च कमी होण्याबरोबर पाण्याचे बाष्पीभवन कमी होत आहे. मका, झेंडू, बडीशेप, लेट्यूस, बाजरा, मोहरी, गाजर आदी सापळा किंवा आंतरपिके, पक्षिथांबे, चिकट सापळे, (Maize, marigold, dill, lettuce, millet, mustard, carrot etc. traps or intercrops, bird droppings, sticky traps,) मधुमक्षिकापेट्या शेतात ठेवणे आदी
पद्धतीचा अवलंब होतो. एकूण व्यवस्थापनातून कलिंगडाचे एकरी २० ते २५ टनांपर्यंत तर खरबुजाचे सात ते १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. गुणवत्तेतही वाढ झाली आहे.

विविध वाणांचा वापर (Use of different varieties)

धान्य बाजार, भीमथडी जत्रा, कृषी प्रदर्शने (Grain market, agricultural exhibitions) आदींच्या माध्यमातून प्रल्हाद यांना बाजारपेठेतील मागणी व कल लक्षात आला. व्यापाऱ्यांना कमी दरात माल देण्यापेक्षा थेट विक्री केल्यास नफा वाढू शकतो हे देखील जाणले. त्यानुसार नियोजनात बदल केला. अलीकडील काळात कलिंगड, खरबुजाच्या
विविध रंगी वाणांचा वापर ते करू लागले आहेत. सध्याही त्यांच्या सुमारे साडेपाच एकरांत
विविध रंग असलेल्या फळांची लागवड पाहण्यास मिळत आहे.
यात पुढील वाणांची विविधता आढळते.

कलिंगड- (Kalingad)
-वरून हिरवे, आतील गर पिवळा आहे, ग्राहकांकडून चांगली मागणी. दर चांगला, जास्त गर, गोडी अधिक.
-वरून पिवळे आतून लाल- ग्राहकांकडून मागणी चांगली. दरही चांगला
-वरून काळसर व आतून लाल रंगाचा गर.
-वरून हिरवे व आतील गर पिवळा. वरून हिरव्या रंगाच्या रेषा. मागणी व दर चांगला. जास्त गर, गोडी अधिक.

खरबूज (Melon)
-वरून तांबूस पांढरट जाळीसारखे व आतून पिवळसर लालसर रंगाचा गर. मागणी व दर चांगला.
-आतून पांढरे, गोड, गुलाबी पिवळर

थेट विक्री तंत्र अवलंबिले (Direct sales technique adopted)

मागील दोन वर्षे कोरोना काळात वाहतूक, मार्केट (Market Stop) बंद असल्याने प्रल्हाद यांना विक्रीअभावी
मोठे नुकसान सोसाव लागले. अशावेळी थेट विक्री करायची असा निर्धार केला. त्यासाठी
सोशल मीडियातील विविध साधनांचा वापर केला. शेताजवळून मळद- निरावागज रोड आहे.
रस्त्याकडेला स्टॉल उभारून विक्री सुरू केली. गेल्या दोन वर्षांत थेट विक्रीतून एकरी सुमारे
एक ते दीड लाख रुपये नफा मिळवण्यात प्रल्हाद यशस्वी झाले. रंगीत वाणांत काही नमुन्याचा स्वाद ग्राहकांना अनुभवण्यास दिला जातो. विक्रीचे तंत्र आत्मसात झाल्याने बहुतेक सर्व मालाचा पाहता पाहता उठाव होतो. दिवसाला १० ते २० हजार रुपयांपर्यंतही काही वेळा कमाई झालेली आहे.

व्यापाऱ्यांना विक्री केली असती तर कलिंगडाला किलोला सात ते आठ रूपये दर मिळाला असता. थेट विक्रीमुळे हाच दर १० ते १५ ते २० रुपयांपर्यंत किंवा दुप्पट मिळाला. शिवाय ग्राहकांनाही योग्य दरात दर्जेदार माल मिळतो. खरबुजाची (Melon) विक्रीही किलोला २० ते ३० रुपये दराने झाली. दोन वर्षांच्या अनुभवातून आपल्या शेतमालाची चांगली ओळख तयार केली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य ग्राहक (Customer), शेतकरी (Farmer) आदी फोनवर संपर्क करून खरेदी करतात. यंदाही तीन एकरांतील काढणी पूर्ण झाली असून, अडीच एकरातील कलिंगड विक्री होणे बाकी आहे. त्यात जवळपास १० ते १५ टन माल शिल्लक आहे. प्रल्हाद मोर्फा संस्थेचे सदस्य आहेत. येत्या काळात आगाऊ मागणी नोंदवून ‘होम डिलिव्हरी’
करण्याचाही विचार असल्याचे ते सांगतात.

संपर्क : प्रल्हाद वरे, ९८२२९००९११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT