Pomegranate Agrowon
ॲग्रो गाईड

शेतकरी पीक नियोजन : डाळिंब

चोपडी (ता. सांगोला) येथील सतीश पाटील हे एकूण २२ एकर शेतीमध्ये १४ एकरांवर डाळिंब पीक घेतात. उर्वरित क्षेत्रावर अन्य हंगामी पिके असतात.

टीम ॲग्रोवन

शेतकरी : सतीश माणिक पाटील

गाव : चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर

एकूण क्षेत्र : २२ एकर

डाळिंब क्षेत्र : १४ एकर

-----------------------

चोपडी (ता. सांगोला) येथील सतीश पाटील हे एकूण २२ एकर शेतीमध्ये १४ एकरांवर डाळिंब पीक (Pomegranate Crop) घेतात. उर्वरित क्षेत्रावर अन्य हंगामी पिके (Seasonal Crop) असतात. गेल्या २२ वर्षाच्या अनुभवातून त्यांनी आपली डाळिंब बाग (Pomegranate Orchard) फुलवली आहे. दरवर्षी प्रामुख्याने मृग आणि हस्त बहर घेतो. मृगामध्ये सध्या पाच एकर क्षेत्र आहे, तर हस्त बहरासाठी पाच एकर धरणार आहे. चार एकरांवर नवीन लागवड (Pomegranate Cultivation) केली आहे. सर्वसाधारणपणे डाळिंबाचे एकरी १० ते १२ टन उत्पादन घेतो. त्यांचा रासायनिक आणि सेंद्रिय यांचा मध्य साधत ‘रेसिड्यू फ्री’ व प्रामुख्याने निर्यातक्षम डाळिंब उत्पादनावर भर असतो. गेल्या आठ वर्षांपासून नेदरलँड, जर्मन, दुबई या देशात डाळिंबाची निर्यात केली जाते. दरवर्षी साधारणपणे ४० ते ५० टनांपर्यंत निर्यात होते. निर्यातीमध्ये आतापर्यंत प्रति किलोला सर्वाधिक १६५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. डाळिंबातल्या या उत्कृष्ट कामगिरीबाबत कृषी विभागाचा रिसोर्स फार्मर हा पुरस्कार देऊन कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मानही झाला आहे.

मृग बहराचे नियोजन ः-

-सध्या मृग बहर धरला आहे. बहराच्या आधी जानेवारी ते मे दरम्यान विश्रांतीच्या काळामध्ये बोर्डो आणि कीटकनाशकाची फवारणी करून घेतली आहे.

-गेल्याच महिन्यात पावसाअगोदर १६ मे रोजी पानगळ करून घेतली. त्या आधी दोन दिवस सलग दहा तास पाणी देऊन जमीन ओली करून घेतली.

-हा बहर धरण्यापूर्वी चार महिने अगोदर छाटणी केली. खोडाला बोर्डो मिश्रणाचे पेस्टिंग केले. बेडमध्ये शेणखत २० किलो, कंपोस्ट खत सहा किलो, निंबोळी पेंड, सुपर फॉस्फेट प्रत्येकी एक किलो आणि डीएपी, एसओपी प्रत्येकी ३०० ग्रॅम प्रति झाड टाकून डाळिंबाची काडी तयार करून घेतली.

-गवताचे प्रमाण वाढू नये आणि रोगाला प्रतिबंधासाठी मल्चिंग पेपर फायद्याचा ठरतो आहे. त्यासाठी मल्चिंगबरोबर ठिबकसाठी दोन लॅटरल टाकून घेतल्या आहेत.

-सध्या बाग सेटिंग अवस्थेत आहे.

गेल्या दहा दिवसांतील नियोजन ः-

-सध्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासू नये म्हणून पाचशे लिटरच्या टँकमध्ये रासायनिक स्लरी बनवून प्रति झाड एक लिटर या प्रमाणे ठिबक मधून दिली.

-डाळिंबाच्या बेडवरील मल्चिंग शेजारी वाढलेले गवतही कोळप्याने नुकतेच काढून घेतले आहे

-ठिबक संचामधून सूत्रकृमींच्या प्रतिबंधासाठी गेल्या आठवड्यातच कीडनाशक सोडले आहे.

-कळी चांगली आणि जोमदार सुटण्यासाठी ०ः६०ः२० हे विद्राव्य खत दर आठ दिवसांनी प्रतिएकर सहा किलो सोडतो आहे.

-फळधारणा चांगली होण्यासाठी मधमाशीचा वावर जास्त व्हावा, यासाठी ताक आणि गुळाची फवारणी करून घेतली.

-वातावरणातील बदलानुसार कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या. त्याशिवाय पोषक घटकांच्याही फवारणी घेतली.

पुढील वीस दिवसांतील नियोजन ः-

-कळी गळ होऊ नये, यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी घेणार आहे.

-ठिबकमधून ६ः४५ः६ हे खत प्रतिएकरी सहा किलो प्रमाणात सोडणार आहे.

-सध्या पावसाळी आणि उन्हाळी असे मिश्र वातावरण राहत आहे. त्यामुळे थ्रीप्स, माइट्‌स यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांच्या प्रतिबंधासाठी फवारणी घेण्याचे नियोजन आहे.

-त्याशिवाय एकरी साधारण ३० कामगंध सापळे लावणार आहे.

-सध्या बागेला चार दिवसातून दोन तास ठिबकमधून पाणी सोडतो आहे. आता पुढे पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याचे नियोजन करणार

आहे.

-आता पावसाच्या वातावरणात अतिरिक्त फूट निघणार आहे. तीही काढून घेणार आहे.

---------------

-सतीश पाटील, ९४२३२३४९६२

(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT