Ornamental Sunflower, white Marigold  Agrowon
ॲग्रो गाईड

Ornamental Sunflower, white Marigold : शोभिवंत सूर्यफूल, पांढऱ्या झेंडूची नवी जात

Ornamental Sunflower, white Marigold Cultivation : सजावट तसेच बागेमध्ये लागवडीसाठी शोभिवंत सूर्यफूल, पांढऱ्या झेंडूची नवी जात उपलब्ध झाली आहे. ही दोन्ही पिके आपल्याकडे चांगल्या प्रकारे येतात. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन या पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे.

Team Agrowon

यशवंत जगदाळे
सजावट तसेच बागेमध्ये लागवडीसाठी शोभिवंत सूर्यफूल, पांढऱ्या झेंडूची नवी जात उपलब्ध झाली आहे. ही दोन्ही पिके आपल्याकडे चांगल्या प्रकारे येतात. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन या पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे.

शोभिवंत सूर्यफुलाच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, क्षाराचे प्रमाण ०.७ पेक्षा जास्त असलेली जमीन निवडावी. कमी नत्र असलेली जमीन सूर्यफूल पिकासाठी उपयुक्त असते. लागवड बियांपासून रोपे तयार करून केली तरी चालते. लागवड करताना एका गादीवाफ्यावर ४ ओळी आणि दोन ओळीतील अंतर २० x २० सेंमी ठेवावे. फुलांची वाढ १/४ झाल्यावर तोडणी करावी. वेळेवर तोडणी केल्यावर फूल जास्त काळ टिकते. तोडणी केल्यावर फुलांना देठासह जंतुनाशक असलेल्या पाण्यात ठेवावे. यामध्ये क्लोरीनचा वापर केल्यास फुले १२ ते १८ दिवस टिकतात.

वैशिष्टे ः
* दाट लागवडीसाठी फायदेशीर जात.
* गडद भगवा रंग, फुलाचा आकार १२ सेंमीपर्यंत.
* जास्त पाकळ्या असल्याने उत्कृष्ट व आकर्षक फूल.
* कमी खतात चांगली वाढ. ४५ ते ५५ दिवसात काढणीस तयार.
* लहान दिवस असल्यावर फूल आकार व देठ छोटा आणि मोठा दिवस असल्यास आकार व देठ मोठा राहतो.
* फुलांचा देठ वेळोवेळी तोडून नवीन पाण्यात ठेवल्यास फुलांचे आयुष्य वाढू शकते.
*लग्न कार्यात सजावटीसाठी, बुके सजावटीसाठी, लॅन्डस्केप करिता फायदेशीर.

पांढरा झेंडू जातीची वैशिष्टे ः
पांढरा झेंडू जातीच्या फुलांना चांगला दर मिळतो. या फुलांना उग्र वास कमी असतो. झेंडू पिकामध्ये एक वेगळा रंग, व्हॅनिला पांढरा रंग असलेले फुले कोणत्याही बागेत आणि कटफ्लॉवरच्या मांडणीमध्ये एक विलक्षण रंगसंगतीसाठी उपयुक्त. फुलांना चांगला सुगंध असतो. झेंडू फुलपाखरांना आकर्षित करतात आणि बऱ्यापैकी कमी पाणी व खतामध्ये या पिकाची वाढ समाधानकारक होते.

जातीची वैशिष्टे ः
उंची १ ते ३ फूट पर्यंत असते. योग्य प्रकारे वाढण्यासाठी दररोज ५ ते ६ तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
* फुले पांढऱ्या रंगाची, ७.५ सेंमी (३ इंच) व्यास, वजन १८ ते २० ग्रॅम.
* फुले चालू होण्यास लागणारा कालावधी: ४५ ते ५० दिवस.
* उत्पादनः २ किलो प्रती झाड (एकरी १० टन)
-------------------------------------------------------
संपर्क ः यशवंत जगदाळे,९६२३३८४२८७
(प्रकल्प प्रमुख, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Cotton Purchase: परभणी जिल्ह्यात सीसीआयपेक्षा खासगीत जास्त कापूस खरेदी

Dashparni Extracts Production: लातूरला तीस हजार लिटर दशपर्णी अर्क निर्मिती

BT Cotton Seed Case: अप्रमाणित बीटी कपाशी नमुना प्रकरणी अंकुर सीड्स कंपनीची निर्दोष मुक्तता

Kharif Sowing Plan: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६.९७ लाख हेक्टरवर खरीप पेरणी प्रस्तावित

Business Loan: लघू उद्योजकांना २० टक्के वाढीव कर्ज

SCROLL FOR NEXT