Crop Advisory Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : भात, आंबा, काजू पिकाचे व्यवस्थापन

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भात, आंबा आणि काजू पिकातील व्यवस्थापनाविषयी पुढील सल्ला दिला आहे.

Team Agrowon

हवामान अंदाजानुसार कोकण विभागात ७ ते १३ सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा २४ .२१ % जास्त राहण्याची शक्यता आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भात, (Paddy) आंबा (Mango) आणि काजू (Cashaw) पिकातील व्यवस्थापनाविषयी पुढील सल्ला दिला आहे.

भात

हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता बाह्य स्त्रोतातून पाणी घेऊन भात खाचरात पाण्याची पातळी पाच ते दहा सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावी. भात पीक सध्या पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे. हळवे भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा ४३५ ग्रॅम युरिया प्रति गुंठा पावसाची तीव्रता कमी असताना द्यावे. भात पिकावर सुरळीतील अळी, खोडकीड, तपकिरी तुडतुडे आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यानूसार नियंत्रणाच्या उपायोजना कराव्यात.

आंबा, काजू

आंबा पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून ढगाळ व दमट वातावरणामुळे नवीन लागवड केलेल्या आंब्याच्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी कीडग्रस्त शेंडे काढून अळीसह नष्ट करावेत. पावसाची किमान ५ ते ६ तास उघडीप मिळेल असे पाहून लॅंम्ब्डासायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५ % प्रवाही) २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी अधिक प्रभावी होण्याकरिता द्रावणात स्टिकर आणि स्प्रेडर मिसळून फवारणी करावी.

आंबा बागेतील गवत काढून बागेची स्वच्छता करावी. आंब्याच्या झाडावर खोडकीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे. प्रादुर्भाव झालेल्या खोडाची साल काढून तारेच्या हुकाने कीड बाहेर काढून मारावी. प्रवाही क्लोरपायरीफॉस (२० %) ५० मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून साल काढलेला भाग द्रावणाने चांगला भिजवावा किंवा क्लोरपायरीफॉस (२० %) १० मिली अधिक ५० मिली रॉकेल हे द्रावण छिद्रामध्ये ओतावे. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये व इजा झाल्यास त्याला बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाही याची काळजी घ्यावी. वाळलेल्या फांद्या कापलेल्या भागावर डांबर लावावे. जेणेकरून किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबा आणि काजू च्या झाडावर बुरशीजन्य रोगामुळे फांदे मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी साल उभी तडकल्यासारखी दिसते. त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. सुरुवातीला पांढरट व त्यानंतर तांबूस रंगाचा डिंक बाहेर येतो. फांदी शेंड्याकडून वाळत येते. नविन लागवड केलेल्या भागांमध्ये प्रादुर्भाव मुख्य खोडावर दिसून येतो. रोगाच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी दोन ते तीन इंच खाली कापून नष्ट करावा आणि कापलेल्या भागाला बोर्डो पेस्ट लावावी. एक टक्का बोर्डो मिश्रणाची किंवा कॉपरऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात खोड व फांद्या व्यवस्थित भिजतील अशा प्रकारे फवारणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT