Maize Processing  Agrowon
ॲग्रो गाईड

Maize Processing : विविध प्रक्रिया उद्योगात उपयुक्त मका

भारतात मक्याची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड होते. उत्तर भारतात मक्याचा उपयोग आहारात मोठ्या प्रमाणात होतो.

Team Agrowon

भारतात मक्याची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड होते. उत्तर भारतात मक्याचा उपयोग आहारात मोठ्या प्रमाणात होतो.

तृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात, जनावरांसाठी पशुखाद्य (Animal Feed) आणि कुक्कुट खाद्य (Poultry Feed) म्हणून उपयुक्त आहे. मक्यामध्ये ७५ टक्के स्टार्च, ८ ते १० टक्के प्रथिने, ४ ते ५ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.

मक्याच्या दाण्यामध्ये १२ टक्के भाग अंकुराचा असतो. या अंकुरापासून तेल मिळत. मक्यापासून विविध प्रकारच्या प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने तयार करता येतात.  

मका पिकाचे विविध प्रकार आहेत. प्रकारानूसार मक्याचे विविध वाण आहेत.

१) साधा मका - अन्नधान्य म्हणून, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य तसच मूल्यवर्धीत पदार्थ तयार करण्यासाठी साधा मका वापरला जातो.   

२) प्रथिनयुक्त मका - अन्नधान्य म्हणून आणि मूल्यवर्धीत पदार्थ निर्मीतीसाठी प्रथिनयुक्त मका उपयुक्त आहे. मक्याच्या शक्ती-१ या जास्त प्रथिनयुक्त जातीपासून लहान मुलांसाठी प्रथिनयुक्त आहार करता येतो.

३) चाऱ्यासाठी मका - बऱ्याच भागात जनावरांच्या आहारातील मका हे प्रमुख चारा पीक आहे. हिरव्या मक्यापासून उत्तम प्रतीचा मूरघास तयार करता येतो. 

४) बेबी कॉर्न - सूप, लोणचे, भजी बनविण्यासाठी या मक्याला पंचतारांकीत हॉटेलमध्ये मागणी असते. 

५) पॉप कॉर्न - लाह्या बनविण्यासाठी बेबीकॉर्नचा उपयोग होतो. 

६)स्वीट कॉर्न - कणसे उकडून भाजून खाण्यासाठी मधुमका म्हणजेच स्वीटकॉर्नला जास्त मागणी असते.

मक्यावर प्रामुख्याने कोरडी प्रक्रिया आणि ओली प्रक्रिया अशा दोन प्रकारे प्रक्रिया होते.

कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची कणी, रवा, पीठ, पोहे, तेल आणि पशुखाद्य तयार करता येत.  

मक्यावर ओली प्रक्रिया करून  स्टार्च, अंकुर आणि पेंड सहजरीत्या वेगळी करता येतात.

या ओल्या प्रक्रिया पद्धतीने मिळालेला स्टार्च, साखर,तेल, पेंड यांचा वापर कापड, कागद, औषधे, बेकरी या व्यवसायात केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT