Sugarcane  Agrowon
ॲग्रो गाईड

Khodava Sugarcane Management : उसाचा खोडवा ठेवताना या गोष्टी टाळा

महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटन्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाची कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे.

Team Agrowon

महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटन्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाची कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. राज्यातील एकूण क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. म्हणून ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाप्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे.

खोडवा ऊस व्यवस्थापनाविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. खोडवा पीक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर घेतलेल्या खोडवा उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

ज्या ऊस लागवडीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन आणि उससंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे अशा उसाचाच खोडवा ठेवावा. ऊस पिक विरळ झाल्यास ४५ सेंमी पेक्षा जास्त अंतरावरील नांग्या भरण्यासाठी प्लास्टिकच्या ट्रेनमध्ये तयार केलेली किंवा ऊस रोपवाटिकेतील रोपे दुसऱ्या पाण्याच्या वेळी लावावीत.

खोडवा ठेवायची जमीन सुपीक आणि निचऱ्याची असावी. खोडवा पीक १२ ते १४ महिने वयाचे असताना उसाची तोड होणार असेल तरच खोडवा ठेवावा. शिफारस केलेल्या ऊस जातीचाच खोडवा ठेवावा. खोडवा राखण्याची योग्य वेळ कोणती?उसाची तोडणी ऑक्टोबर पासून एप्रिल - मे पर्यंत केली जाते. या उसाचा खोडवा ठेवला जातो. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो तसतसे खोडव्याचे उत्पादन कमी होत जाते.

म्हणून १५ फेब्रुवारी नंतर तोडलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये. पाडेगाव येथे झालेल्या संशोधनानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते. तसेच आडसाली, पूर्व हंगामी व सुरू या हंगामातील तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास पूर्व हंगामी उसापासून ठेवलेला खोडव्याचे अधिक उत्पादन मिळते. 

खोडवा ठेवताना या गोष्टी करू नयेतपाचट जाळणेपाचट शेताबाहेर काढने एक आड एक सरीत ठेवणे बुडख्यांवर पाचट ठेवणे रासायनिक खतांचा फेकून वापर करणे आंतरमशागत व मोठी बांधणी करणे बगला फोडणे, जारवा तोडणे पाण्याचा अतिवापर करणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Dam Outflow : कोयनासह प्रमुख धरणांतून विसर्गात घट

Students Protest: झेन अल्फांनी वाकवले जिल्हा परिषद प्रशासन

Crop Insurance : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभाग

Kharif Sowing Update: धाराशिवमध्ये खरीप पेरण्या ८८ टक्क्यांवर; टक्केवारी घसरली तरी सोयाबीनसह पिकांची जोमदार वाढ

Ring Road Project : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT