Agriculture Export Agrowon
ॲग्रो गाईड

Agriculture Export : शेतीमाल निर्यातीत वाढ झाल्याचा कृषी मंत्रालयाचा दावा पटतो का ?

भारतातून प्रामुख्याने गहू, बासमती तांदूळ कापूस, कॉफी आणि ताजी फळे यांची निर्यात करण्यात येते.

Team Agrowon

चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान भारताची कृषी (Agriculture Producers Export) आणि संबंधित वस्तूंची निर्यात वाढली आहे. निर्यात ११.९७ टक्क्यांनी वाढून ३०.२१ अब्ज डॉलरवर पोहचली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Agriculture Ministry) सोमवारी (ता.२६) दिली.

भारतातून प्रामुख्याने गहू, बासमती तांदूळ कापूस, कॉफी आणि ताजी फळे यांची निर्यात करण्यात येते. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील एप्रिल-ऑक्टोबरमध्ये ही निर्यात २६.९८ अब्ज डॉलर होती, अशी माहितीही कृषी मंत्रालयाने दिली.

शेतीमाल आणि संबंधित वस्तूंची एकूण निर्यातीत २०२१-२२ मध्ये २० टक्क्यांनी वाढली आहे. निर्यातीतील वाढ ५०.२४ अब्ज डॉलरवर पोहचली. मागील वर्षी शेतीमाल निर्यात ४१.८६ अब्ज डॉलर होती, असेही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२० मध्ये किसान रेल्वे सेवा सुरू केल्याने शेतीमालाची सुरळीत झाली आहे. डिसेंबर अखेर किसान रेल्वे देशातील १६७ मार्गांवर चालवण्यात आली. जवळपास २२ राज्यातील आणि ३ केंद्रशासित प्रदेशातील १२६० बाजारातील विक्रेत्यांनी ई-नामचा फायदा घेतला. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत १.७२ कोटी शेतकरी आणि २.१३ लाख व्यापाऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. त्यासोबतच ४०१५ शेतकरी उत्पादक संस्थांनी नवीन योजने अंतर्गत नोंदणी केली आहे.

दरम्यान शेतीमालाच्या निर्यातीवर बंधन कमी करण्यासंदर्भात विविध शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे. तसेच शेतीमालाची आयातीवर बंधने घालावीत, अशी मागणीही शेतकरी आणि शेतकरी संघटना करत असतात. अलीकडेच अन्नसुरक्षेचे कारण देत सरकारने गहू आणि तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT