Biofertilizer Use  Agrowon
ॲग्रो गाईड

Biofertilizer Use : उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर कसा करावा?

Fertilizers : रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता अपेक्षित उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे फायद्याचे ठरते.

Team Agrowon

Biofertilizers : रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता अपेक्षित उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे फायद्याचे ठरते.

जीवाणू संवर्धने स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत.

तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात. त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळे-हिरवे शेवाळ आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात.

बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची उपलब्धता वाढवितात तर मायकोराईझा सारखे जीवाणू पिकास स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे, यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात.

यापैकी अॅझोटोबॅक्टर आणि रायझोबियम ही संवर्धने प्रचलित झाली असुन इतरांच्या अधिक वापरासाठी कृषि खाते व कृषि विद्यापीठे प्रयत्नशील आहेत. 

 विविध पिकांसाठी  कोणकोणते जीवाणू संवर्धने आहेत?

१. अझॅटोबॅक्टर - एकदल पिके : उदा. ज्वारी, बाजरी, गहू

२. रायझोबियम - द्विदल पिके : उदा. तूर, उडीद, सोयाबीन, मूग, हरभरा, भूईमुग इत्यादी

३. अॅझोस्पीरीलम - ज्वारी, बाजरी, मका, गहू, भात

४. निळे-हिरवे शेवाळ आणि अॅझोला- भात

५. व्हिए-मायकोराईझा - बाजरी, ज्वारी, मका, तूर, भुईमूग

जीवाणू खत (संवर्धन) कसे वापरावे?

अझॅटोबॅक्टर अथवा रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरायचे असल्यास संवर्धनाचे १ पाकीट (२५० ग्रॅम) हे ५०० मि.ली. (अर्धा लिटर) पाण्यात मिसळून द्रावण करावे. हे द्रावण बियाणांवर शिंपडून हलक्या हाताने चोळावे.

जीवाणू संवर्धन लावलेले बियाणे स्वच्छ कागदावर किंवा पोत्यावर सुकवावे आणि लगेच पेरणीसाठी वापरावे. एका पाकीटातील संवर्धन (२५० ग्रॅम) १० ते १५ किलो बियाणांवर प्रक्रिया करण्यास पुरेसे होते.

५० ते १०० ग्रॅम गुळ ५०० मि.ली. पाण्यात मिसळून गळाचे द्रावण तयार करावे. हे द्रावण चिकट होत असल्यामुळे जास्त परिणामकारक ठरते.

------------

स्त्रोत - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT