Team Agrowon
मातीमध्ये अगोदरच असलेल्या इतर जिवाणूमुळे जिवाणू संवर्धनाचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
जमिनीत इतर अन्नद्रव्याची कमतरता असणे, जमिनीत उपलब्ध नत्र खताचा साठा जास्त असणे
वापरलेले जिवाणू खत निकृष्ट दर्जाचे असल्यास ही जिवाणू संवर्धनाचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
शिफारशीपेक्षा जिवाणू खताचा वापर कमी केल्यास, बियांमध्ये विषारी पदार्थ असल्यामुळे, जिवाणू खतात अन्य जिवाणूंची भेसळ असल्यास जिवाणू संवर्धनाचा चांगला पिरणाम होत नाही.
जमिनीचा अयोग्य सामू, जमिनीचे जास्त तापमान, जमिनीतील अपुरा ओलावा या बाबीही जिवाणू संवर्धानाचा परिणाम कमी होण्यास कारणीभूत ठरतात.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थांच्या कमतरतेमुळेही जिवाणू खतांचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत.