Onion Storage Agrowon
ॲग्रो गाईड

Onion Storage : सुधारित पद्धतीने कांदा साठवणूक कशी करावी?

काढणीनंतर कांद्याची योग्यप्रकारे साठवणूक करून चांगला बाजारभाव असताना विक्री करणे फायद्याचे ठरते. यासाठी कांदा काढणी आणि साठवणुकीदरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

Team Agrowon

महाराष्ट्रात तीनही हंगामांत कांद्याची लागवड (Onion Cultivation) केली जाते. मुख्यतः रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. लागवडीनंतर साधारण ११० ते १४० दिवसांत कांदा काढणीस तयार होतो.

बाजारातील चढउतारामुळे कांद्याच्या दरात (Onion Rate) कायम अस्थिरता असते. त्यासाठी काढणीनंतर कांद्याची योग्यप्रकारे साठवणूक करून चांगला बाजारभाव (Onion Market) असताना विक्री करणे फायद्याचे ठरते. यासाठी कांदा काढणी आणि साठवणुकीदरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

साठवणुकीच्या सुरवातीच्या काळात म्हणजे मे ते जुलै महिन्यात वातावरणातील तापमान व आर्द्रता जास्त असते. तेव्हा वजनातील घट व सडण्याची क्रिया यामुळे कांद्याचे नुकसान जास्त होते.

साठवणुकीनंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत तापमान खाली येते व आर्द्रता वाढते. या काळात कांद्यांना कोंब येण्याचे प्रमाण वाढते.

त्यामुळे कांद्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कांद्याचे साठवणुकीदरम्यान नुकसान टाळता याव यासाठी असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा उत्पादकांसाठी कमी खर्चात उभारणी करता येईल अशी सुधारित लाकडी चाळ विकसित केली आहे.

- या चाळीमध्ये लाकडी पट्ट्या व मंगलोरी कौलांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे. चाळीची लांबी १३ मीटर असून चाळ दोन भागांत म्हणजेच दोन पाखी बांधण्यात आली आहे.

- जमिनीपासून उंचावर सिमेंटचा ओटा तयार करून त्यावर लाकडी पट्ट्याच्या फ्रेमच्या साह्याने प्रत्येक पाखीची उंची १.५० मी. व रुंदी १.७५ मी. इतकी ठेवण्यात आली आहे.

यामध्ये तळाच्या व मध्य भागात २० सेंमी. अंतर ठेवून हवा खेळती राहील याची काळजी घेण्यात आली आहे.

- दोन पाखीच्या मध्यभागी १.५० मी. अंतराची मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. चाळीची मध्यभागी उंची ५.३० मीटर असून, चाळीच्या दोन्ही बाजूंनी छत १ मीटर लांबीने वाढविण्यात आले आहे.

जेणेकरून ऊन व पावसापासून कांद्याचा बचाव व्हावा. अशा प्रकारच्या चाळीत रब्बी हंगामातील कांदा ६-७ महिने व्यवस्थित साठवता येऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT